Nashik 11th Admission : नाशिक शहरासाठी अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्या नियमित फेरीची गुणवत्तायादी बुधवारी (ता.२१) प्रसिद्ध झाली.
यादीत ११ हजार ९५३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, सर्वाधिक सहा हजार १९३ विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी निवडले गेले आहेत. (11th admission 11 thousand 953 students were selected in first list nashik news)
विज्ञान शाखेत अनुदानित जागेसाठी खुल्या प्रवर्गातून आरवायके महाविद्यालयाचा कट ऑफ ८९.४० टक्के राहिला. वाणिज्य शाखेचा बीवायके महाविद्यालयाचा कट ऑफ ८७.४ टक्के राहिला. पहिल्या यादीत विज्ञान शाखेचा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावला असून, प्रथमच नव्वदपेक्षा कमी टक्केवारी बघायला मिळाली आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रातील ६४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता अकरावी प्रवेशासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत पहिल्या नियमित फेरीची निवडयादी बुधवारी प्रसिद्ध झाली.
विद्यार्थ्यांनी नोंदविलेले प्राधान्यक्रम आणि त्यांना मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यादी जाहीर होताच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस विद्यार्थी व पालक प्रवेशासाठी दाखल होणार असल्याने यामुळे महाविद्यालयांचे प्रांगण गजबजणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
...म्हणूनच घसरली टक्केवारी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात घट नोंदविली गेली होती. याचा परिणाम अकरावीच्या गुणवत्ता यादीतही बघायला मिळाला. गेल्या वर्षी विज्ञान शाखेच्या अनुदानित जागेवर खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ ९० टक्क्यांहून अधिक राहिला होता.
परंतु यंदा बहुतांश सर्वच महाविद्यालयांमध्ये हा कट ऑफ नव्वद टक्क्यांपेक्षाही कमी नोंदविला गेला आहे. आता पुढील फेऱ्यांमध्ये हा कट ऑफ वाढतो की आणखी घसरतो, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.
‘ईडब्ल्यूएस’चा आधार
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गामुळे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. वार्षिक उत्पन्नाच्या अटी-शर्तींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवर्गातून प्रवेशाची संधी आहे. पहिल्या यादीत ‘ईडब्ल्यूएस’करिता आयवारके विज्ञान शाखेचा कट ऑफ ६१.८० टक्के, तर केटीएचएमचा ६४.२ टक्के, हिरे महाविद्यालयाचा ७० टक्के कट ऑफ राहिला आहे.
पहिल्या निवड यादीतील ठळक नोंदी..
- यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवार (ता.२४)पर्यंत मुदत
- तीन हजार ५६१ विद्यार्थ्यांना मिळाले नाही कुठलेही महाविद्यालय
- आठ हजार ५७४ विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय, सर्वाधिक चार हजार १३ विद्यार्थी विज्ञान शाखेचे
- इनहाउस कोट्याच्या दोन हजार १४६ जागा, ३२९ प्रवेश निश्चित
- अल्पसंख्यांक कोट्याच्या एक हजार २४० जागा, ३३२ प्रवेश निश्चित
- मॅनेजमेंट कोट्याच्या ९७२ जागांपैकी एकावर प्रवेश
- राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएस बोर्डातील विद्यार्थ्यांचाही यादीत समावेश
शाखा उपलब्ध जागा प्राप्त अर्ज निवड झालेले विद्यार्थी
विज्ञान ९,४९८ ८,४१६ ६,१९३
वाणिज्य ७,५५७ ४,७३७ ३, ८७४
कला ४,४०० २,२७० १,७९८
एचएसव्हीसी ९०७ ९१ ८८
एकूण २२,३६२ १५,५१४ ११,९५३
प्राधान्यक्रमनिहाय विद्यार्थी संख्या-
प्रथम प्राधान्य---८,५७४
द्वितीय प्राधान्य---१,५३९
तृतीय प्राधान्य-----७४०
प्रमुख महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा प्रवर्गनिहाय कट ऑफ
(अनुदानित जागांसाठी, आकडे गुणांच्या टक्केवारीत)
महाविद्यालय खुला ओबीसी एससी एसटी
आरवायके ८९.४० ८३.८० ७९.६० ७९.८०
केटीएचएम ८८.२० ८१.४ ७५.६० ८१.४०
केएसकेडब्ल्यू, सिडको ८६.६० ८० ७३.२० ७६.४०
भोसला सैनिकी ८६.४० ७८.८० ७६.४० ७९.२०
नाशिक रोड, बिटको ८५.८० ७६.०० ७५.६० ६३.८०
व्ही. एन. नाईक (विनाअनुदानित) ८२.६० ७२.६० ६५.६० ५१.८०
हिरे महाविद्यालय, पंचवटी ८२ ७२.२० ६९.६० ७८.८०
जी. डी. सावंत (विनाअनुदानित) ७०.२० ५०.४० ५१.६० ४६
वाणिज्य, कला शाखेचा खालावला कट-ऑफ
वाणिज्य शाखेत खुल्या प्रवर्गाचा अनुदानित जागेगसाठी बीवायकेचा कट-ऑफ ८७.४० टक्के राहिला. केटीएचएमचा इंग्रजी माध्यम ८१.६०, मराठी माध्यम- ७३.२० टक्के, भोसला महाविद्यालय (इंग्रजी माध्यम) ८०.४० टक्के, नाईक व हिरे महाविद्यालय ६० टक्के कट-ऑफ राहिला. तर कला शाखा अनुदानित जागांसाठी खुल्या प्रवर्गात एचपीटीचा कट-ऑफ ७४.२० टक्के, केटीएचएमचा कट-ऑफ ७१.६० टक्के राहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.