नाशिक : येथील नाशिक महापालिका (NMC) हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या (11th admission) प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागणार आहे. शिक्षण विभागाने (Education department) सोमवारी (ता. १८) अर्ज प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे परीपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. २२) पासून सुरू होणार आहे, तर सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले जाईल. (11th Admission Part 2 filling process of application from starting from Friday nashik education Latest marathi news)
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच गेल्या ३० मेपासून अकरावी प्रवेशाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरल झालेली होती. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रिभूत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरायची प्रक्रिया सुरू आहे.
यात विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती दाखल करायची आहे, तर इयत्ता अकरावीची शाखा व महाविद्यालयाच्या पसंतीक्रम निवडीसाठी अर्जाचा भाग दोन सुरू होण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून होती. अखेर सोमवारी शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. त्यानुसार अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
दहापर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार
अर्जाच्या भाग दोन अंतर्गत किमान एक ते कमाल दहापर्यंत शाखा, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. यापूर्वीच्या नियमानुसार पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयासाठी निवड झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक राहण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.