Nashik News : विद्यालयाच्या घवघवीत निकालामुळे अकरावीचा Cut Off वाढणार; प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

11 th Admission News
11 th Admission Newsesakal
Updated on

Nashik News : नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जाहीर केले आहे.

दहावीचा ऑनलाइन निकाल घोषित झाल्याने अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरु झाली आहे. बुधवारपासून (ता. १४) अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. तालुका व शहरातील एकूण ७२ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या १० हजार ५६० जागा उपलब्ध आहेत.

नाशिक जिल्ह्यासाठी ऑफलाइन पद्धतीने बेस्ट ऑफ फाईव्ह गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. (11th cut off will increase Admission schedule announced 10 thousand 560 seats in 72 colleges Nashik Educational News)

दहावी परीक्षेचा निकाल २ जूनला ऑनलाइन निकाल जाहीर झाल्याने प्रवेशासाठी कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याने विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा असलेला कल पाहता विज्ञान प्रवेशासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.

मालेगाव शहर व तालुक्यात २९ अनुदानित, ११ अंशत: अनुदानित, ३२ विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित अशा ७२ कनिष्ठ महाविद्यालयातून अकरावी प्रवेशासाठी मालेगाव ग्रामीणची कला, विज्ञान, वाणिज्य या तीन शाखांची एकूण क्षमता ४ हजार ८०० आहे.

यात कला शाखेसाठी ३ हजार ४०, वाणिज्य ३२० व विज्ञान शाखेसाठी १ हजार ४४० क्षमता आहे. मालेगाव शहरातील प्रवेश क्षमता संयुक्तपणे एकूण ५ हजार ७६० जागांची आहे. यात कला शाखेसाठी सर्वाधिक २ हजार ५६० जागा आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेसाठी २ हजार ३२०, वाणिज्य शाखेसाठी ७२०, संयुक्त १६० अशी शाखानिहाय क्षमता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

11 th Admission News
Nashik News : सिडकोवासीयांच्या जिवाशी खेळ; 36 वर्षापूर्वी बांधलेला जलकुंभ झाला जीर्ण!

अकरावी प्रवेशासाठी वैधानिक सामाजिक आरक्षण

अकरावी प्रवेशासाठी अनुसूचित जाती -१३, अनुसूचित जमाती-७, विमुक्त जाती अ- ३, एनटी ब- २.५, एनटी क- ३.५, एनटी ड- २, विशेष मागासप्रवर्ग- २, इतर मागास प्रवर्ग- १९, आर्थिक दुर्बल घटक- १०, इनहाऊस कोटा-१०, अल्पसंख्यांक कोटा- ५०, व्यवस्थापन कोटा-०५ टक्के असून पेसा क्षेत्र, महिला, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, क्रीडा, समांतर आरक्षण यांना नियमानुसार प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशाचे निश्‍चित केलेले वेळापत्रक

-१४ ते १७ जून - प्रवेश अर्ज वितरण व जमा करणे

-१९ ते २१ जून- अर्ज छाननी, संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे

-२१ जून (सायंकाळी चारला)- पहिली संवर्गनिहाय गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी प्रदर्शित करणे

- २२ ते २४ जून - पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

- २६ ते ३० जून - रिक्त जागांवर प्रतीक्षा याद्यांप्रमाणे प्रवेश देणे

- १ जुलै - अंतिम प्रवेश यादी जाहीर करणे

11 th Admission News
Nashik Crime: प्रसूतीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन; सातपूरच्या मायको हॉस्पिटलमधील प्रकार

"यंदा बहुतांश शाळा, विद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. बहुसंख्य विद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी विशेष प्रावीण्य व जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने अकरावीच्या सर्व शाखांसाठी कट ऑफ वाढणार आहे."

- प्रा. अनिल महाजन, सचिव,जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना

11 th Admission News
Nashik News : अंथरुणावर खिळलेल्या चिमुकलीवर नामकोत यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.