PM Gram Vikas Yojana : पंतप्रधान विकास योजनेतून आदिवासी गावांना 12 कोटी मंजूर

Funds
Funds esakal
Updated on

PM Vikas Yojana : आदिवासी भागातील मूलभूत सुविधांसाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून पंतप्रधान विकास योजनेतून १२ कोटी मंजूर झाले आहे.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी बारा कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे.

यातून नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील आदिवासी गावांमध्ये अंतर्गत रस्ते, शाळेच्या वाढीव वर्गखोल्या होत्या. (12 crore sanctioned to tribal villages from Pradhan Mantri Vikas Yojana nashik news)

शाळांभोवती वॉल कंपाउंड, स्मशानभूमीचे बांधकाम आदी कामांसाठी पंतप्रधान आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाल्याने नाशिक तालुक्यातील २६, इगतपुरी तालुक्यातील २०, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १८ याप्रमाणे ६४ आदिवासी गावांत विकासकामे होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

लोकसभा मतदारसंघातील आदिवासी भागातील ग्रामस्थांकडून मूलभूत सुविधांच्या कामांसाठी वर्षापासून खासदार गोडसे यांच्याकडे सततची मागणी होत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील एकूण ६४ गावांमधील विकासकामांसाठी पंतप्रधान आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Funds
Narendra Modi to NDA MP: मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, PM मोदींचा NDA खासदारांना संदेश

यातून नाशिक तालुक्यातील दुगाव, देवरगाव, देवरगाव (वैष्णवीनगर), तिरडशेत, जलालपूर, पिंपळगाव (ग), सुभाषनगर, शास्त्रीनगर, गंगाम्हाळुंगी, धोंडेगाव (कश्यपनगर), नाईकवाडी, धोंडेगाव, राजेवाडी, चांदशी, ओझरखेड, महादेवपूर, सदगाव, नागलवाडी, लाडची, रायगडनगगर, गणेशगाव, देवठाण, निगडोल, देवघर या गावांमध्ये पाच कोटी पाच लाखांची २७ कामे, इगतपुरी तालुक्यातील अडसरे (खु), निनावी, आंबेवाडी, शेनवड (बु), खैरगाव, सोनोशी, गरुडेश्वर, सोमज, बारशिंगवे (राहुलनगर), बारशिंगवे, भंडारदरावाडी, शेणवड (खु), कुसेगाव, वाघ्याची वाडी, भरवीर (खु), टाकेद (बु), घोडेवाडी, बाभळेवाडी, शेवगेडांग, मांजरगाव या गावांमध्ये तीन कोटी ८७ लाखांची २० कामे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष, वरसवीर, तोरणगाव (त्र्यं.), तोरणगाव (ह), टाकेदेवगाव, सोमनाथनगर, शिवाजीनगर, शिरसगाव, सारस्ते, साप्ते, सापतपाली, सामुंडी, हातलोंडी, पिंप्री (त्र्यं.), पागलवाडी, निरगुडे, शिरसगाव, नांदगाव (फ) या गावांमध्ये तीन कोटी एक लाखांची १८ कामे होणार आहेत.

सदर कामांमध्ये गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत बांधणे, तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे अशी कामे होणार आहेत.

Funds
Nashik Tribal Development : आदिवासी विकास महामंडळाची डिजिटल वाटचाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.