Nashik Rain Update : इगतपुरीत धुवाधार पाऊस सुरू; पूर्व भागात भात लागवडीस आला वेग

While rice planting is underway in the eastern part of the taluka due to incessant rains
While rice planting is underway in the eastern part of the taluka due to incessant rains esakal
Updated on

Nashik Rain Update : पुनर्वसू नक्षत्राच्या अंतिम दोन दिवसात पावसाने इगतपुरी तालुक्यात संततधार कायम आहे. गेल्या बारा तासांपासून सर्वदूर हजेरी लावल्याने पूर्व भागात भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे.

या पावसामुळे इतर पिकांनाही जीवदान मिळाले आहे. पाऊस मोठा नाही परंतु संततधार असल्याने भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची भात लागवडीसाठी व इतर पिकांच्या पेरणीची धांदल सुरू झाली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून रोहिणी, मृग, आर्द्रा ही नक्षत्रे जेमतेम पावसाने गेली. त्यामुळे शेतात उभी पिके संकटात आली होती. (12 hours of rain rice cultivation work in eastern region has been speeded up nashik news)

दुबार पेरणी करावी लागते की काय अशी अवस्था होती. मुबलक पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडीला ब्रेक लावला होता.

या पावसामुळे विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी नशिबावर हवाला ठेवून वरई, नागली, उडीद, सोयाबीनची पेरणी केली आहे, त्यांनाही याचा मोठा फायदा झाला आहे.

इगतपुरी तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. पाऊस चांगला पडल्याने व पुढेही पडेल या पार्श्वभूमीवर दुभत्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. पुनर्वसूच्या रिपरिपीने शेतात निरुपयोगी गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा बंदोबस्त करण्याचे शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहन आहे.

समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी रासायनिक खतांच्या दुकानात गर्दी करू लागला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य दरात रासायनिक खते, बी-बियाणे मिळते की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While rice planting is underway in the eastern part of the taluka due to incessant rains
Nashik Rain Alert : जिल्ह्यातील घाट विभागामध्ये आज अन उद्या जोरदार पावसाचा अंदाज

धरणांचे पोट मात्र रिकामेच

इगतपुरी हा सर्वाधिक धरणांचा तालुका असून पावसाचे माहेरघर समजले जाते. त्यामुळे पाऊस नेहमीप्रमाणे कोसळत असल्याने बळीराजा समाधानी आहे. मात्र यंदाच्या हंगामात जोरदार असा पाऊस होत नसल्याने तालुक्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये जुलै महिन्यामध्ये होणारा अपेक्षित असा पाणीसाठा होत नसल्याने धरणांचे पोट रिकामे राहिल्यासारखे वाटत आहे. दारणा, मुकणे, भाम, वाकी, भावली या धरणांमध्ये अतिशय संथगतीने वाढ होताना दिसून येत आहे.

यंदाचा बुधवारपर्यतची स्थिती

बुधवारचा पाऊस : ३६ मिलिमीटर

आजपर्यंतचा पाऊस : १२८४ मिमी

इगतपुरी ः धरणातील साठा

दारणा : ६५.३७ टक्के

मुकणे : ५२.८४ टक्के

वाकी : १२.५२ टक्के

भावली : ७०.२९ टक्के

भाम : ३७.२२ टक्के

कडवा : २९.२१ टक्के

वालदेवी : २३.०४ टक्के

While rice planting is underway in the eastern part of the taluka due to incessant rains
Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाने राज्याला झोडपले; मुंबईत रेड अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.