Nashik SMBT Hospital: ‘एसएमबीटी’मध्ये 12 सुपरस्पेशालिटी विभाग कार्यान्वित; या शस्त्रक्रिया होतील मोफत

Nashik SMBT Hospital: ‘एसएमबीटी’मध्ये 12 सुपरस्पेशालिटी विभाग कार्यान्वित; या शस्त्रक्रिया होतील मोफत
esakal
Updated on

Nashik SMBT Hospital: एसएमबीटी हॉस्पिटलने सतत नव्या तंत्रज्ञानाची कास धरत अनेक अद्ययावत उपकरणे आणली असून, त्यामुळे सुपरस्पेशालिटीतील सर्व उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे.

करुणा आणि सहानुभूती व उपचारांची अचूकता यामुळे लाखो रुग्णांची पावले आता ‘एसएमबीटी’कडे वळू लागली आहेत. (12 superspecialty departments operational in SMBT hospital nashik news)

तब्बल १२ सुपरस्पेशालिटी विभाग याठिकाणी कार्यान्वित करण्यात आले असून, विविध शस्रक्रियांसाठी १७ सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स उभारण्यात आले आहेत. यातील चार ऑपरेशन थिएटर्समध्ये पूर्णवेळ सुपरस्पेशालिटी विभागांतर्गत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. हे विभाग कार्यान्वित झाल्याने अनेक क्लिष्ट शस्रक्रिया याठिकाणी होत आहेत. एकाच छताखाली २५ विभागांच्या सेवा देणारे उत्तर महाराष्ट्रातील एसएमबीटी एकमेव हॉस्पिटल आहे.

हृदयविकार व शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, मूत्रविकार शस्त्रक्रिया, मेंदू व मणकेविकार शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, किडनी व डायलिसिस, प्लास्टिक सर्जरी, इंटर्वेंशनल रेडिओलॉजी, पोटाचे विकार, अवयव प्रत्यारोपण या सुपरस्पेशालिटी उपचारांसाठी रुग्ण उत्तर महाराष्ट्र किंवा ठाणे, पालघर परिसरच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशीम, मुंबईसह गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

गेल्या तीन वर्षांत सुपरस्पेशालिटी सेवांचा ६९ हजार ७४२ रुग्णांनी लाभ घेतला. त्या खालोखाल आयपीडी म्हणजेच आंतररुग्ण सेवा गेल्या तीन वर्षांत नऊ हजार ६५५ इतकी होती. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा आकडा नऊ हजार ९४७ इतका झाला आहे. यात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत (आभा कार्ड), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके)धारक रुग्णांची संख्या अधिक होती.

Nashik SMBT Hospital: ‘एसएमबीटी’मध्ये 12 सुपरस्पेशालिटी विभाग कार्यान्वित; या शस्त्रक्रिया होतील मोफत
Health Care News: व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? वाचा एक्स्पर्ट काय सांगतात…

त्यांच्यावर मोफत उपचार झाले आहेत. जे आजार योजनेत बसू शकले नाहीत अशा रुग्णांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलने अतिशय नाममात्र दरात उपचार उपलब्ध करून दिले आहेत. येथील हृदयविकार विभाग उत्तर महाराष्ट्रातील अतिशय अद्ययावत हृदयविकार विभाग समजला जातो.

टाटा मेमोरियल सेंटरच्या तांत्रिक मार्गदर्शनाने कर्करोगावर मोठे काम सुरू आहे. ब्लड कॅन्सरवर भारतीय संशोधन असलेल्या इम्म्यूनोअक्ट व एसएमबीटीचा करार झालेला असून, कारटी-सेल थेरपी पुढील महिन्यापासून याठिकाणी सुरू होईल. न्यूरो मायक्रोस्कोप येथे दाखल झाला आहे. या मायक्रोस्कोपच्या माध्यमातून मेंदू व मणक्याच्या क्लिष्ट शस्रक्रिया करणे शक्य झाले. उत्तर महाराष्ट्रात सांधे प्रत्यारोपणासाठी ठराविक रुग्णालयांना योजनेतून मोफत शस्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली, त्यात एसएमबीटी हॉस्पिटलचा समावेश आहे.

या शस्त्रक्रिया अगदी मोफत

हृदयविकार, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, जन्मजात हृदयविकार, बलून शस्त्रक्रिया, ई-पी स्टडी, पेसमेकर, बायपास, वॉल्व्ह दुरुस्ती व बदल, लहान मुलांची ओपन हार्ट सर्जरी, तोंडाचा व जिभेचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय व अंडाशयाचा कर्करोग, जठर व आतड्यांचा कर्करोग, थायरॉईड ग्रंथींचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग, मेंदूतील गाठींची शस्त्रक्रिया, कवटीचे हाड बसविणे, मणक्यातील नस मोकळी करणे, मणक्यातील नसा व गाठींची शस्त्रक्रिया, पोटातील क्लिष्ट शस्त्रक्रिया, लहान-मोठे आतडे, स्वादुपिंड, जठर, अन्ननलिकेच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, प्रोटेस्ट ग्रंथींची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, किडनी स्टोन, मूत्रमार्गातील अडथळे, किडनीची शस्त्रक्रिया, गुडघा- खुबा- सांधे प्रत्यारोपण, दुर्बिणीद्वारे लिगामेंटची शस्त्रक्रिया व सर्व प्रकारच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातात.

Nashik SMBT Hospital: ‘एसएमबीटी’मध्ये 12 सुपरस्पेशालिटी विभाग कार्यान्वित; या शस्त्रक्रिया होतील मोफत
Health Care News: शरीरातील सूज कमी करण्यासाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.