Nashik : जिल्ह्यातील 12 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

Farmers latest marathi news
Farmers latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : दोन वर्ष नियमित कर्ज (Loan) फेडणाऱ्या शेतकरी यांना शासनाकडून ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील सुमारे १२ हजाराहून अधिक नियमित शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. (12 thousand farmers of district will benefit of Incentive subsidy of Rs 50000 nashik Latest Marathi news)

Farmers latest marathi news
आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला 'तो' पूल मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा उभारला

२७ जुलै रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाने २०१८-१९ व २०१९ ते २०२१ या तीन वर्षांपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

याअनुषंगाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यापूर्वीच्या निर्णयानुसार घेतलेल्या माहितीनंतर जिल्ह्यातील सुमारे १२ हजार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासद यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

या योजनेतून जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना ६० कोटी रुपये मिळणार आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मागील पाच वर्षापूर्वी एक हजार ७१० कोटी रुपयांपर्यंत पीक कर्ज वाटप करीत होते. मात्र नोटबंदीनंतर बँकेची आर्थिक पत ढासळली आहे.

त्यामुळे जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकांचा पीक कर्ज वाटपाचा आकडा वाढला आहे. सद्यःस्थितीत बँकेकडून आतापर्यंत ४०० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

Farmers latest marathi news
ZP माजी अध्यक्ष अन उपाध्यक्षांसह सभापतींची हुकली संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.