Nashik News : सदोष APPमुळे 12 हजार प्रामाणिक शेतकऱ्यांना फटका

Farmer Loss News
Farmer Loss Newsesakal
Updated on

नाशिक : सलग तीन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मध्यंतरी अनेक वर्षे त्याची अंमलबजावणी रखडली.

मागील वर्षी त्याची अंमलबजावणी सुरू झाली, तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ॲप्लिकेशनला अडचण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रामाणिक शेतकऱ्यांना बँकेच्या अप्लिकेशनमुळे फटका बसला.(12 thousand honest farmers loss due to faulty APP Nashik News)

Farmer Loss News
Nashik News : पक्षांना नायलॉन मांजाचा बसू लागलाय फास

नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ३२ हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी साडेबारा हजार शेतकऱ्यांच्या बाबतीत ही अडचण पुढे आली आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र मदतीची रक्कम थेट जमा झाली. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून १९ हजार ४९३, तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून १२ हजार ५०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आले आहेत.

थेट अनुदानासाठी २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या निकषास पात्र ठरणार आहेत. अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज रकमेच्या आधारे जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून सात हजार ३४७ शेतकऱ्यांना अनुदान रक्कम प्राप्त झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही दुसऱ्या टप्प्यात रक्कम अदा करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Farmer Loss News
Nashik News : Citylincसाठी नवीन दीड हजार बसथांबे

एनडीसीसी ॲपचा प्रॉब्लेम

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १२ हजार ५०० शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची माहिती ॲप मॅचिंग न झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात जाऊ शकली नाही. परंतु दुसऱ्या टप्प्यात शासनाचे ॲप खुले झाल्यानंतर संबंधित माहिती अपलोड केल्यानंतर त्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ॲप्लिकेशन मॅचिंग न झाल्याने एकाही प्रस्तावाची माहितीच जाऊ शकली नाही. एकूणच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची पन्नास हजारांपर्यंतच्या अनुदानाची रक्कम मिळण्यात अडचणी आहे.

अनुदानासाठी पात्र

बँका प्रस्ताव अनुदान

राष्ट्रीयीकृत बँक १९४९३ ७३४७

एनडीसीसी १२५०० ००००

"तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज रकमेच्या आधारे जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून सात हजार ३४७ शेतकऱ्यांना अनुदान रक्कम प्राप्त झाली. मात्र एनडीसीसीच्या खातेदारांच्या ॲपमुळे अडचण असल्याने त्यांना दुसऱ्या टप्प्यात रक्कम अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत."

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

Farmer Loss News
Nashik News : निराधार बालक दत्तक घेणाऱ्या यंत्रणेला मातांचा विसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.