Nashik : 13 किलोमीटरची लोखंडी पाइपलाइन वादात

Pipeline reference image
Pipeline reference imageesakal
Updated on

नाशिक : २००२-०३ मध्ये गंगापूर धरणातून टाकलेल्या १३ किलो मीटरच्या थेट सिमेंट पाइपलाइनचे भवितव्य अजूनही वीस वर्ष शिल्लक आहे. त्याशिवाय मागील वीस वर्षात अवघे तीनदा लिकेज झाले असताना पाणीपुरवठा विभागाकडून भीती दाखवून २१० कोटी रुपये किमतीची १३ किलोमीटरचे लोखंडी पाइपलाइन टाकण्याचा घाट पाणीपुरवठा विभागाकडून घातला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. (13 Iron water Pipeline Controversy Nashik Latest Marathi News)

त्या व्यतिरिक्त प्रस्तावित मेट्रो मार्गावरच पाइपलाइन टाकली जाणार असल्याने मेट्रोला मार्ग कोठून राहणार, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

माजी महापौर दशरथ पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत तांत्रिक बाजू मांडल्या. याच दरम्यान यापूर्वी २००२-०३ या वर्षात ज्या ठेकेदाराने १३ किलोमीटरची सिमेंटची पाइपलाइन टाकण्याचे काम केले, त्यांनीच ४० वर्ष सिमेंट पाइपलाइनचे भवितव्य असल्याचे सांगून अजूनही वीस वर्ष सिमेंट पाइपलाइन सुस्थितीत राहणार असल्याचा दावा केला. सातपूरच्या अमृत गार्डन चौकात सिमेंट पाईपला लिकेज झाल्याने गेल्या ११ दिवसांपासून सातपूर विभागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून २५ फूट खोल खड्डा, तसेच भविष्याची गरज ओळखून नवीन लोखंडी पाइपलाइन पाण्याची गरज व्यक्त करताना तसा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर केला. पाणीपुरवठा विभागाच्या या घाईकडे आता संशयाने बघितले जात आहे. वीस वर्षांपूर्वी गंगापूर धरणातून शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान १७०० मिलिमीटर व्यासाची थेट जलवाहिनी टाकण्यात आली.

सिडको ते सातपूर दरम्यान बाराशे मिलिमीटर जलवाहिनी व गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र यादरम्यान आणखीन एक बाराशे मिलिमीटर व्यासाची अशा तीन थेट जलवाहिनी टाकण्यात आल्या. सिमेंटच्या जलवाहिनीचे आयुर्मान ४० वर्षे इतके आहे. त्यात वीस वर्षे उलटले असून, या कालावधीत फक्त तीनदा लिकेज झाले.

Pipeline reference image
Bribe Case : कार्यकारी अभियंता बागूल यांच्या काळातील कामांची चौकशी करा

मात्र, भविष्यात मोठा गंभीर पाणीप्रश्‍न निर्माण होण्याचे वातावरण निर्माण करून पाणीपुरवठा विभागातून २१० कोटी रुपयांच्या नव्या थेट जलवाहिनीचा प्रस्ताव मंजूर करून संकटात संधी साधली जात असल्याचा आरोप माजी महापौर पाटील यांनी केला.

मुंबई या देशातील मोठ्या शहरात मोठ्या पाण्याच्या पाइपलाइन आहे. येथे गळती झाल्यास चार ते आठ तासांमध्ये गळतीशोधक पथक येऊन दुरुस्ती होते. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका गळतीशोधक पथक का तयार करत नाही असा सवाल करताना पथकाची गरज व्यक्त केली.

..तर मेट्रो प्रकल्प धोक्यात

ज्या भागातून पाइपलाइन टाकली जाणार आहे, त्याच जलवाहिन्यांच्या मार्गावर मेट्रो लाइनदेखील असल्याने मेट्रोची पाइपलाइनचा विचार प्रशासनाने केला नाही, असा आरोपदेखील त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात पाणीपुरवठ्याच्या घाईमुळे मेट्रो प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

"महापालिका आयुक्त नवीन असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून त्यांची दिशाभूल केली जात आहे पुढील वीस वर्षे सिमेंट ची पाइपलाइन चालणार असताना नवीन २१० कोटी रुपयांच्या लोखंडी पाइपलाइन ची आवश्यकता काय यावरून महापालिकेवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते." - दशरथ पाटील, माजी महापौर, नाशिक.

Pipeline reference image
वीज पुरवठा खंडितचा बँकांना शॉक; वीजेअभावी कामकाज ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()