‘Ashoka Medicover’ मध्ये 13 वर्षीय मुलावर स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया यशस्वी

A team of doctors performing a successful surgery on a thirteen-year-old boy at Ashoka Medicover Hospital.
A team of doctors performing a successful surgery on a thirteen-year-old boy at Ashoka Medicover Hospital.esakal
Updated on

नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रथमच एका तेरावर्षीय मुलावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वादुपिंडाची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्रक्रिया करण्यात प्रसिद्ध पोट व यकृत विकार विभागप्रमुख डॉ. तुषार संकलेचा व टीमला यश प्राप्त झाले.

याप्रसंगी मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ डॉ. सुशील पारख यांनी सर्व वैद्यकीय टीमचे अभिनंदन केले आहे. (13 year old boy underwent successful pancreatic surgery in Ashoka Medicover hospital Nashik Latest Marathi News)

सातपूर परिसरातील वैभव गवई या १३ वर्षीय मुलाला सायकल खेळताना सायकलचे हॅन्डल लागून रुग्णाला पोटात असाह्य वेदना होत होत्या. पोटात रक्तस्राव झाल्याचे निदान करून (Laparotomy) शस्रक्रिया करण्यात आली होती.

तरीही तब्येतीत सुधारणा न होता, प्रकृती खालावत गेली त्यामुळे रुग्णाला तत्काळ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल आपत्कालीन विभागात दाखल केले. डॉ. तुषार संकलेचा यांनी तत्काळ उपचार सुरु केले.

प्राथमिक चाचणीत स्वादुपिंडाला सूज व स्वादुपिंडाला जोडणारी मुख्य वाहिनेची दोन तुकडे झाल्याचे आढळले. या अगोदर पोटाची शस्त्रक्रिया झाल्याने परत करणे रुग्णासाठी धोकादायक ठरले असते म्हणून दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.

A team of doctors performing a successful surgery on a thirteen-year-old boy at Ashoka Medicover Hospital.
Dhule : गुलमोहर रेस्ट हाऊसला ट्रॅक्टर ट्रॉली धडकली

डॉ. संकलेचा यांनी दुर्बिणीद्वारे पोटाला आरपार छिद्र पाडून व पित्तरसाचा थैलीला छिद्र पाडून एक नळी आरपार टाकण्यात आली व पित्तरसाला पोटात वाट मोकळी करून देण्यात टीमला यश आले.

पोटाची ओपन शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीद्वारे संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. यामध्ये शल्य विशारद तज्ज्ञ डॉ. जी. बी. सिंग, भूलतज्ज्ञ डॉ. केतन, बालरोग तज्ञ डॉ. सुशील पारख, डॉ. नेहा मुखी, डॉ. किरण मोटवाणी व संपूर्ण एन्डोस्कोपी टीमचे प्रयत्न व सहकार्यामुळे ही अवघड शस्रक्रिया करण्यात यश आले.

"सर्व उपचार आता एका छताखाली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मिळत आहेत म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल सर्वसमावेशक पर्याय म्हणून पुढे आले आहे."
- डॉ. सुशील पारख, मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशू व बालरोग तज्ञ , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल

"सर्व सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे, अगदी लहान मुलांपासून ते सर्व वयाच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आम्ही कौशल्य प्राप्त केले आहे. सदर रुग्णाच्या उपचारात या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केल्यामुळे रुग्ण संपूर्ण बरा झाला आहे . " - समीर तुळजापूरकर, केंद्रप्रमुख, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल

A team of doctors performing a successful surgery on a thirteen-year-old boy at Ashoka Medicover Hospital.
Dhule Crime : शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.