Nashik News: सिन्नर तालुक्यातील 43 रस्त्यांचे भाग्य उजाळणार; 131 कोटींचा निधी मंजूर

funds
fundsesakal
Updated on

Nashik News: आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सिन्नर विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पूल व इमारतींसाठी १३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून ४३ रस्त्यांचे भाग्य उजाळणार आहे.

रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निधीची मागणी आमदार कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. (131 crore fund sanctioned for 43 roads in Sinnar taluka nashik news)

त्यानुसार हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी देण्यात आली. प्रमुख जिल्हा मार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या रस्त्यांसाठी ४८ कोटी रुपये मंजूर झाले.

अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आदिवासी विकास विभागाकडून ३५ कोटी निधी मंजूर झाला आहे. ठाणगाव ते केळी रस्त्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो. परिसरातील ग्रामस्थांच्या समस्येची दखल घेत आमदार कोकाटे यांनी या पुलासाठी ३.५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.

funds
Nashik News: बसथांबा स्वच्छतागृह ठेकेदाराकडून बेकायदेशीर वसुली; ‘महिलांसाठी मोफत’ फलक लावण्याचे आदेश

धोंडबारला सुविधांयुक्त वसतिगृह

धोंडबार (ता. सिन्नर) येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी सुमारे १४ कोटी व मुलांच्या वसतिगृह इमारतीसाठी सुमारे १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या वसतिगृहांत सर्व सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

"टाकेद गटातील आदिवासी गावांमध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा करून आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे आपले ध्येय आहे. तथापि, इतर भागांतही रस्त्यांचे जाळे मजबूत करून दळणवळण सुलभ करून सर्वांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अजित पवार यांची पाठराखण केल्याने सिन्नर तालुक्याला मोठा निधी मिळू लागला आहे." -माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

funds
Mumbai Agra Highway: मुंबई महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अपघातप्रवण क्षेत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.