NMC News: जाहिरातींसाठी शहरात 14 नवीन ठिकाणे! 36 दिशादर्शक फलकांचा समावेश

NMC on Hoardings
NMC on Hoardingsesakal
Updated on

नाशिक : उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिकेच्या विविध कर विभागाने १४ नवीन ठिकाणे जाहिरातीसाठी देणार आहे.

एका ठिकाणावरून साधारण किमान ५२ लाख रुपये महसुल प्राप्त होण्याची आशा आहे. ३६ दिशादर्शकांच्या मागील बाजूसदेखील जाहिरातींसाठी जागा दिली जाणार असून यातून वार्षिक दोन कोटी रुपये मिळणार आहे, अशी माहिती उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली. (14 new spots in town for advertising Includes 36 Directional Panels NMC News nashik)

NMC on Hoardings
NMC News: मनपाकडून 451 दिव्यांगांना मिळणार 'इतके' अर्थसाहाय्य

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी महापालिकांना राज्य व केंद्र सरकारने उत्पन्नाची साधने वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने विविध कर विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. त्यात जाहिरात स्थळाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने १४ नवीन ठिकाणे निश्चित करून त्यावर किमान २१ होर्डिंग्जवर जाहिरातींसाठी परवानगी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

२००८ मध्ये महापालिकेने प्रमुख रस्त्यांवर दिशादर्शक कमानी लावल्या. या कमानी लावताना पन्नास टक्के जागा उत्पन्नासाठी जाहिराती लावण्यासाठी होत्या. परंतु कालांतराने वाद न्यायालयात पोहोचला होता. आता याच ३६ दिशादर्शकांच्या मागील बाजूस जाहिराती लावण्यास जागा दिली जाणार आहे.

NMC on Hoardings
NMC News: मनपा शिक्षकांना आजपासून प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.