Nashik News : लोकसहभागातून साकारले 144 वनराई बंधारे!

Forestry dams constructed in the taluka.
Forestry dams constructed in the taluka.esakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : कृषी विभागाने पुढाकार घेतल्याने तालुक्यात लोकसहभागातून १४४ वनराई बंधारे पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्याच्या माध्यमातून ३० ते ३५ टीसीएम पाणी अडविले गेले असून, त्यामुळे साधारणपणे ६५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी संरक्षित पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. अतिपावसामुळे उपलब्ध झालेल्या ओढे व नाल्यांमधील पाणी प्रवाहांना अडविण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याची मोहीम कृषी विभागाने सुरू केली आहे. (144 forest dams made through public participation in yeola nashik Latest Marathi News)

या वनराई बंधारे बांधलेल्या भागांमधील जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास, तसेच जलसंधारणास मदत होणार आहे. रब्बी हंगामासाठी पिकांना व पशुपक्ष्यांसाठी पाणीसाठे उपलब्ध होतील. तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक उत्स्फूर्तपणे श्रमदान करत वनराई बंधाऱ्याची उभारणी केली आहे.

त्याअंतर्गत तालुक्यातील पाटोदा, अंदरसूल, खिर्डीसाठे, जळगाव नेऊर, अनकाई, शेवगे, सातारे, नांदूर, अनकुटे, ममदापूर, चिचोंडी, शिरसजगाव लौकी, कानडी, मुरमी आदी गावांमध्ये हे बंधारे साकारले आहेत. गावोगावच्या कृषी सहाय्यकांना कृषी विभागाने दहा बंधारे करण्याचे उद्दिष्ट दिले होते. कृषी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदतीला घेऊन श्रमदानातून या वनराई बंधाऱ्यांची यशस्वी उभारणी केली आहे.

...असे आहेत वनराई बंधारे

वनराई बंधारा बांधकामाचा एक कच्चा व तात्पुरता प्रकार असतो. याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने करता येते. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो.

नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरीत्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून, बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजवीज काही प्रमाणात करता येते. कोणत्याही नाला, ओढा अथवा पाण्याच्या प्रवाहात पाण्याचा साठा जास्तीत-जास्त होऊ शकेल, अशा जागेची निवड यासाठी करण्यात येते. प्रवाहाच्या कमी रुंदीच्या ठिकाणाची निवड यासाठी करण्यात येते.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

Forestry dams constructed in the taluka.
Success Story : तुषार देवरे ठरला गावातील पहिला अधिकारी; जिद्दीच्या बळावर ‘STI’ पदाला गवसणी

असे साकारले बंधारे

कृषी सहाय्यक व शेतकऱ्यांनी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून त्यांची तोंडे प्लॅस्टिकच्या दोऱ्यांनी शिवून त्या बंधाऱ्यासाठी वापरण्यात आले. तालुक्यात डोंगर-दऱ्या, नदी-नाले मोठ्या प्रमाणावर असल्याने पाणी वाहत असते. हे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर टाइप बंधारे मोठ्या संख्येने केलेले आहेत. मात्र ज्या भागातून पाणी वाहून जाते, तेथील पाणी अडविण्यासाठी कृषी विभागाने वनराई बंधारे केले असून, हे अडलेले पाणी काही अंशी जमिनीत झिरपणार असल्याने याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकणार आहे.

"अजूनही अनेक भागातून, नाल्यातून पावसाचे पाणी वाहून जाते आहे. या वनराई बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवले असून, काहीअंशी जमिनीत जिरणार आहेत. त्याचा फायदा नक्कीच विहिरीची पाणीपातळी टिकून राहण्यास होईल." -भीवराज व्यापारे, शेतकरी,अनकाई

"वनराई बंधारे केल्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवले जाते. त्यामळे पिकांना संरक्षित पाणी देता येऊ शकणार आहे. कृषी विभागाने चांगले काम केले असून १४४ बंधारे साकारले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी अजूनही वाहत असेल त्याठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने अजूनही वनराई बंधारे करावे." -संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी, येवला

Forestry dams constructed in the taluka.
Nashik News : गोबर गॅस कालबाह्य होण्याच्या मार्गावर; बहुतेकांचा कल LPG सिलिंडरकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.