Nashik : पॅरोलवरील दीडशे आरोपी नॉट रिचेबल

criminal
criminalesakal
Updated on

जुने नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे (Corona) पॅरोल (Parole) रजेवर घरी सोडण्यात आलेले सुमारे दीडशे आरोपी (Criminal) नॉट रिचेबल झाले आहे. पोलिस त्यांच्या शोधात आहे. मध्यवर्ती कारागृह (Central Jail) अधिकारी कर्मचाऱ्यांकडून शहर जिल्ह्याच्या विविध पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले. (150 accused on parole are not rechable Nashik crime News)

दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता अधिक होती. मध्यवर्ती कारागृहात विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना पॅरोल रजेवर त्यांच्या घरी पाठविण्यात आले होते. त्यातील बहुतांशी आरोपी परिस्थिती सामान्य झाल्याने पुन्हा कारागृहात हजर झाले आहे. शहर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले सुमारे दीडशे आरोपी अद्याप हजर झालेले नाही. त्यांनी दिलेल्या संपर्कावर पोलिसांनी संपर्क साधला. त्यांनी कारागृहात पुन्हा हजर होण्यासाठी दिलेली तारीख उलटली. त्यानंतर काहींना पुन्हा १५ दिवसाची अतिरिक्त हजर राहण्याची मुदत वाढवून दिली. तीही मुदत संपली तरीदेखील ते अद्याप हजर झाले नाही.

अशा आरोपी संदर्भात न्यायालयाकडून माहिती मागवण्यात आली आहे. त्यानिमित्ताने पॅरोलवरील आरोपींची शोधाशोध सुरू झाली आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांकडून आरोपी रहिवासी असलेल्या परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शहर जिल्ह्यातील दीडशे आरोपींचा त्यात समावेश आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन आरोपींवर मंगळवार (ता.२१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र धोंडूसिंग राजपूत असे पहिल्या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. १६ मे २०२० मध्ये त्यास ४५ दिवसांकरिता पॅरोलवर घरी सोडण्यात आले होते. प्राणघातक हल्लाप्रकरणी या आरोपीस सात वर्षाची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड झाला होता. एक सप्टेंबर २०१५ शिक्षा झाली होती. पॅरोलची मुदत संपूनही आरोग्य परत आल्या नसल्याने त्याच्याशी संपर्क साधला. २२ मे २०२२ तो हजर होणार होता. तसे झाले नाही त्याचं १५ दिवसांची ६ जून २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली. तरीदेखील तो हजर राहिला नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी सद्दाम नसीम कुरेशी यास २७ सप्टेंबर २०२१ रोजी ४५ दिवसाच्या पॅरोल रजेवर घरी सोडण्यात आले होते.

criminal
एक हाती कारभाराचा मनसे पॅटर्न शिवसेनेच्या मुळावर

कालावधी उलटून अनेक दिवस झाल्यानंतर त्याचा संपर्क साधला असता त्याने ११ मे २०२२ रोजी हजर होण्यास संमती दर्शवली होती. हजर न राहिल्याने त्यासही १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. २६ मे २०२२ रोजी हजर होणे अपेक्षित होता. परंतु तो हजर झाला नाही. पंतनगर जिल्हा मुंबई पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. ४ ऑक्टोंबर २०१६ त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. आरोपी तलावडी भद्रकाली भागात राहत असल्याने दोन्ही घटनेतील आरोपीविरुद्ध मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार संजय कदम यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

criminal
नाशिक : मास्टर मॉलच्या आगीवर 48 तासानंतर पूर्ण नियंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()