नामपूर : ताणतणावात, अचानक उद्भवणाऱ्या आजारपणामुळे अनेक मध्यमवर्गीय, नोकरदार मेडिक्लेम पॉलिसीला प्राधान्य देतात; परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीने संजीवनी दिली.
गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीने गरजू रुग्णांना १५० कोटींहून अधिक आर्थिक मदत केली आहे. (150 crore to needy from Chief Minister Assistance fund lot of costly diseases that not there before included nashik)
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.
गोरगरीब- गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जाते.
मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. सहाय्यता कक्षाने अवघ्या १७ महिन्यांत १९ हजारांहून अधिक रुग्णांना १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश चिवटे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉक्लियर इन्प्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
मदतीसाठी पाच प्रकारचे निकष
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. तसेच, जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इन्प्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात हृदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदींसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते. डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये, तर अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत दिली जाते.
"मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत मिळविण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही. पूर्णपणे ऑनलाइन प्रोसेस करून वैद्यकीय मदत देण्यात येते. यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येतो."
- मंगेश चिवटे, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.