Nashik News : Citylincसाठी नवीन दीड हजार बसथांबे

City Link News
City Link Newsesakal
Updated on

नाशिक : महापालिका परिवहन महामंडळातर्फे शहरातील व बाहेरील अनेक नव्या मार्गांवरून बस धावत आहेत. नव्याने विकसित झालेल्या भागात नवीन मार्गावर बस धावत असल्याने ठिकठिकाणी बसथांबे नव्याने उभारण्यात येत आहेत.

म्हसरूळ येथील किशोर सूर्यवंशी मार्गावरील पुणे विद्यार्थिगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय ते बोरगड या मार्गावर नव्याने बस धावत आहे. सिटीलिंकसाठी नव्याने दीड हजार बसथांबे होत असून, जाहिरातीच्या माध्यमातून महापालिकेस ६६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

किशोर सूर्यवंशी मार्गावरील बेटी बचाव चौक ते बोरगड यादरम्यान नव्याने बसथांबे उभारण्यात आले आहेत. सध्या त्यावर ना वेळापत्रक, ना बसचा क्रमांक अशी परिस्थिती आहे. बोरगड, कंसारामाता चौक, ओंकारनगर, गोरक्षनगर या ठिकाणी कमी अंतरावर हे बस थांबे उभारण्यात आले आहेत.(1500 New bus Stops for City Link Municipal Corporation get income of Rs. 66 lakh Nashik News)

City Link News
Nashik News : पक्षांना नायलॉन मांजाचा बसू लागलाय फास

काही ठिकाणी बसथांबे उभारण्यासाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. तयार बसथांबे आणून उभे केले जात आहेत. परंतु, हे बसथांबे ऊन, वारा, पाऊस यापासून नागरिकांना व प्रवाशांना किती संरक्षण देतील, याबद्दल शंका आहे.

बसथांब्यावर पुरेशी माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, दोन बसथांब्यांमधील अंतर खूप कमी असल्याने त्याचा संबंधितांनी फेरविचार करावा, अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

City Link News
Nashik News : बांधकाम Online परवानग्यांमध्ये नाशिक राज्यात प्रथम

"बसथांबे बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर बांधण्यात येत आहेत. नाशिकमधील रस्त्यांवर ८८० आणि शहराबाहेर ६४६ बसथांबे नव्याने होत आहेत. महापालिका परिवहन महामंडळ सिटीलिंकतर्फे कोणत्या ठिकाणी थांबा उभारायचा ते ठिकाण महापालिकेच्या बांधकाम विभागास कळविले जाते. पुढील कार्यवाही बांधकाम विभागातर्फे केली जाते. बसथांबे खासगी कंपनी उभारून देत आहे. त्यावर त्यांची जाहिरात असणार आहे. त्या बदल्यात महापालिकेस दर वर्षी ६६ लाख उत्पन्न मिळणार आहे."

-मिलिंद बंड (सिटीलिंक प्रशासनाचे सरव्यवस्थापक)

City Link News
Rajya Natya Compition : कसब पणाला लावून उभा केला ‘गावगाडा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()