Nashik News : विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून उलगडला नाशिकचा 151 वर्षांचा इतिहास

Nashik: Students recounting 151 years of Nashik's history through dance at the 'Espalier' Experimental School's Annual Symposium on Friday
Nashik: Students recounting 151 years of Nashik's history through dance at the 'Espalier' Experimental School's Annual Symposium on Fridayesakal
Updated on

नाशिक : धार्मिक व पौराणिक महत्त्व असणाऱ्या मंदिरांच्या इतिहासापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाशिकविषयी असलेल्या अनेक घटनांचा संदर्भ उलगडत तब्बल १५१ वर्षांचा जाज्वल्य इतिहासाची मांडणी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली.

निमित्त होते, इस्पॅलियर एक्सपिरिमेंटल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. नाशिक जिल्हा निर्मितीला १५१ वर्ष पूर्ण झाल्याने खास त्या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नाशिकच्या शतकोत्तर वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. (151 years history of Nashik was revealed by students in a School Gathering Nashik News)

Nashik: Students recounting 151 years of Nashik's history through dance at the 'Espalier' Experimental School's Annual Symposium on Friday
Nashik News : मालेगावात ॲप्पल बोरची धूम! रोज पंधराशे कॅरेटची आवक

नाशिकची ओळख बनलेल्या नाशिक ढोल वादनाने या स्नेहसंमेलनास धडाक्यात प्रारंभ झाला. त्यानंतर जनस्थान, गुलशनाबाद, नासिक ते नाशिक असा प्रवास विद्यार्थ्यांना सादर केला. पंचवटीतील श्रीरामांचे वास्तव्य, हनुमान जन्मभूमी आणि पंचवटीतील काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचा पटही विद्यार्थ्यांनी उलगडला.

ज्यांच्या अस्तित्वामुळे नाशिकच्या भूमीची जगभरात ओळख झाली अशा थोर व्यक्तींचा जीवनपट विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्णरितीने सादर केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके, वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रजांचे नटसम्राट ते स्वांतत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुतेचे सादरीकरण असो. तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विज्ञानवादी विचार पालकांसमोर उलगडले.

वसंत कानेटकर, अनंत कान्हेरे, वामनदादा कर्डक, दादासाहेब गायकवाड, अण्णाभाऊ साठे, पंडित पलुस्कर, भारतातील पहिल्या महिला वकील सरोबाजी, कलेक्टर जॅक्सनचा वध यांच्यापासून ते क्रीडा विश्वात नाशिकचा झेंडा फडकविणारे क्रिकेटपटू बापू गाडगीळ, धावपटू कविता राऊत यांच्यापर्यंत अनेक व्यक्तींचा जीवनपट विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केला.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Nashik: Students recounting 151 years of Nashik's history through dance at the 'Espalier' Experimental School's Annual Symposium on Friday
Nashik News : यशू जन्‍माचा भाविकांकडून जल्‍लोष

नाशिक कावडी, योगाचे महत्त्व ते अहिराणी भाषेचा गोडवा विद्यार्थ्यांना नृत्य व गीत गायनातून सादर केला. पैठणीवर रॅप साँग सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनीही ठेका धरत लक्ष वेधले. याप्रसंगी कवी प्रकाश होळकर, अभिनेता चिन्मय उदगीरकर, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापिका वैशाली जालीहलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहसंमेलनात नदी-निसर्गाचे विलोभनीय वर्णन होते.

गोदावरी नदीच्या उगमापासून ते नाशिकला लाभलेले धार्मिक महत्त्व, गोदावरीचे गीत सादर करत नदी ते निसर्गाचे लाभलेले सुंदर कोंदण यांचे विलोभनीय वर्णन विद्यार्थ्यांना नृत्य सादरीकरणातून केले. त्याचबरोबर सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची औद्योगिक क्षेत्राची वाटचाल, देशातील एकमेव तोफखाना केंद्र, नोटांची छपाई करणारी नोटप्रेस, शैक्षणिक हब, रंगपंचमी व होळीची रहाड परंपरा, द्राक्ष पंढरी, येवल्याची पैठणी, समृद्ध शेती, आदिवासी समाजाच्या परंपरा, गड किल्यांची ऐतिहासिक माहिती, नाशिक ढोल ते मिसळपाव असा विविधांगी पट विद्यार्थ्यांना उलगडला.

Nashik: Students recounting 151 years of Nashik's history through dance at the 'Espalier' Experimental School's Annual Symposium on Friday
Nashik News : काळाराम मंदिरात काळाकुट्ट अंधार; व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()