Nashik Crime : तिवंदा येथील कारखान्यातून घरफोडीत सुमारे ७ लाखांचे १६ किलो चांदीचे भांडे चोरी झाल्याचे घटना शुक्रवार (ता.१८) उघडकीस आली होती.
भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अंबड येथून चांदी जप्त केली आहे. संशयित फरार असून, शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे. (16 kg silverware seized from Ambad Nashik Crime)
तक्रारदार सुनील घोडके यांच्या तिवंदा येथे चांदीचे भांडे बनविण्याचा कारखान्यातून गुरुवारी (ता. १७) रात्री ६ लाख ९३ हजारांची १६ किलो चांदी चोरी झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी संशयितांची ओळख पटविली.
भद्रकाली गुन्हे शोध पथक संशयिताचा शोध घेत होते. गर संशयिताने चोरी केलेले चांदीचे भांडे एका बॅगेत ठेवून उत्तमनगर येथे राहत असलेल्या घराच्या आवारात ठेवून दिले होते. पोलिस मागावर असल्याचे वृत्त त्यास समजले.
त्याने त्याच्या दाजींना घडलेला प्रकार सांगितला. ते कामावर असल्याने त्यांनी घराशेजारी राहणाऱ्या महिलेस खात्री करण्यास सांगितली. तपासादरम्यान भद्रकाली पोलिसांनी संशयिताची बहिण आणि दाजींची चौकशी केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्या वेळी त्यांना फोन नंबर देऊन संशयिताची माहिती मिळाल्यास कळविण्यास सांगितले होते. त्यामुळे खात्री पटताच दाजींनी लगेचच सर्व माहिती गुन्हे शोध पथकास दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, संदीप शेळके, सागर निकुंभ, धनंजय हासे, लक्ष्मण ठेवणे, सोनल काथवटे घटनास्थळी दाखल होत चोरी गेलेले १६ किलो चांदीचे भांडी जप्त केले.
दरम्यान, त्या महिलेने परिसरातील माजी नगरसेवकांना माहिती दिल्याने त्यांनी अंबड पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अंबड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. चांदी मिळून आली असली तरी संशयित मात्र फरार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.