Ranbhaji Mahotsav : रानभाज्या, राखी महोत्सवातून नाशिकला 16 लाखांची उलाढाल

Wild vegetable festival in Jalgaon on Sunday news
Wild vegetable festival in Jalgaon on Sunday newsesakal
Updated on

Ranbhaji Mahotsav : गत १५ दिवसांपासून नाशिक पंचायत समितीच्या आवारात सुरू असलेल्या रानभाज्या व राखी महोत्सवाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला.

महोत्सवात ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंना जिल्ह्यासह राज्यातून मागणी आल्याने मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

१७ दिवसांत महोत्सवात एकूण १६ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यात सर्वाधिक सव्वादोन लाख रुपयांचे कडधान्याची विक्री झाली आहे. उमेदच्या तत्त्व ब्रॅण्ड कपडे विक्रीतून ७० हजार कमविले. (16 lakhs turnover to Nashik from wild vegetables Rakhi festival news)

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. १४ ऑगस्टला या महोत्सवाचे उद्‍घाटन झाले होते.

गावरान ठेचा, नागली, ज्वारी, बाजरीची चुलीवर भाजलेली भाकरी, हस्तमागाच्या वस्तू, भरड धान्यांपासून बनविलेले खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे गृहपयोगी वस्तू त्या देखील ग्रामीण धाटणीच्या अशा प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थ हे या ठिकाणी विक्रीस होते.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचतगटाच्या महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही येथे भरले होते. तब्बल २९१ महिला बचतगटांनी यात सहभाग नोंदविला होता. आकर्षक हस्तमागाच्या वस्तू, तत्त्व या ग्रामीण महिलांच्या ब्रँडने तयार केलेले सुती कपडे, साड्या, तसेच पेठ- सुरगाणा- त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागांमध्ये तयार होणारे रानभाज्या, भरड धान्यापासून केक, डोसा, चटणी यांचे प्रिमिक्स, नागलीचे बिस्कीट आणि कडधान्य आदी गोष्टी यातून विक्री झाल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Wild vegetable festival in Jalgaon on Sunday news
Crop Insurance : शेतकऱ्यांना हेक्टरी 6 ते 10 हजारांपर्यंत मदत; 25 टक्के मदतीचे आकडे निश्चित

३१ ऑगस्टला या महोत्सवाचा समारोप झाला. १७ दिवसांत विविध स्टॉलवरून सुमारे १५ लाख ८१ हजार ४७० रुपयांची उलाढाल झाली आहे. यात नागली बिस्किटांची ८५ हजार, राख्यांची ३२ हजार, तत्त्व ब्रॅण्डचे कपड्यांची ७० हजार, २० हजार रुपयांच्या पुरणपोळ्या, नागली भाकरी यांची विक्री झालेली आहे.

सर्वाधिक विक्री झालेल्या बचतगटांचा गौरव

महोत्सवात सर्वाधिक विक्री झालेल्या बचतगटांचा गौरव करण्यात आला. यात पहिला क्रमांक मोगरा बचतगट, मातोरीने पटकविला आहे. जय बजरंगबली बचतगट सुरगाणा व सावित्रीबाई फुले बचतगट यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

"‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या व राखी महोत्सवाला नाशिकरांनी मोठा प्रतिसाद दिला. या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली आहे. २९१ हून अधिक बचतगटांनी यात सहभाग घेतला होता. जिल्ह्यात आता अशाच प्रकारे आणखी काही ठिकाणी महोत्सव आयोजित करण्यात येतील." - प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

Wild vegetable festival in Jalgaon on Sunday news
Nashik ZP News : वेळेत निविदा न उघडणे कार्यकारी अभियंत्याच्या अंगलट; जि. प. अधिकाऱ्यांनी मागविला खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.