पंचवटी (जि. नाशिक) : ‘आधारतिर्थ’ आश्रमात चार वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच म्हसरुळ पोलिस ठाणे हद्दीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात संस्थाचालकानेच १४ वर्षीय शाळकरी मुलीला व्हिडीओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पाेलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादनुसार बालकांचे लैंगिक अपरधपासून संरक्षण अधिनियम अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. संशयित संस्थाचालकाला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.हर्षल बाळकृष्ण मोरे (३२, रा. ‘द’ किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रम, मानेनगर, म्हसरूळ, नाशिक) असे संशयित संस्थाचालकाचे नाव आहे.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
याबाबत अधिक माहिती अशी की,हर्षल उर्फ साेनू हा स्वतंत्र पद्धतीने गुरुकुल आश्रमाचे काम पाहत असून त्याने जिल्ह्यातील आदिवासी पाडे व दुर्गम भागातील गाेरगरिब व हलाखीची परिस्थिती आहे . ज्यांची शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सक्षम नाही.अश्या बेघर कुटुंबातील ३० हून अधिक मूले - मुली एकत्र करुन राे हाऊसमध्ये वसतिगृह सुरु केले आहे. ताे शहर व जिल्ह्यातील दानशूर नागरिकांना भेटून गरिब मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणत असल्याचे दाखवून देणग्या गोळा करीत असे. या जमा होत असलेल्या देणगीतून काही मुला - मुलींना जवळपासच्या काही शाळेत प्रवेश करुन दिले आहेत.
दरम्यान, आदिवासी पाड्यावरील चौदा वर्षीय मुलगी गुरुकुल आश्रमामार्फत शिक्षण घेत असताना १३ आॅक्टाेबर ते १२ नाेव्हेंबरदरम्यान पीडिता ही इतर मुलींसह झाेपलेली असताना माेरे याने तिला ‘तु माझे हातपाय दाबायला ये’ अस म्हणूण बाेलवून घेतले. तसेच हात पाय दाबून घेऊन त्याने मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ तिला बघायला लावून अश्लिल स्पर्श केला.
त्यानंतर त्याने पीडितेला हाॅस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. या घटनेने पीडिता घाबरून गेली हाेती. मात्र तिने सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर फसाळे यांना अत्याचाराची घटना कळविली. त्यानुसार तिने फिर्याद दिली असून गुन्ह्याचा तपास सरकारवाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.