Sakal Exclusive : गोदावरी नदीवर पूररेषेबाहेर पूल; मुदत संपल्यानंतर नवीन पुलांची निर्मिती

Ahilya Devi Holkar Bridge Under construction at Godapark.
Ahilya Devi Holkar Bridge Under construction at Godapark. esakal
Updated on

Sakal Exclusive : सध्या गोदावरी नदीवर असलेल्या सतरा पूल पूररेषेत येत आहे. त्याचबरोबर छोटे पूल असल्याने भरावामुळे शहराची उंची वाढतं आहे.

त्यामुळे या पुलांची मुदत संपुष्टात आल्यानंतर पूररेषेबाहेर नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे आता भविष्यात गोदावरी नदीवर उंच पूल उभे राहतील.

नाशिक शहर गोदावरी नदीच्या किनारी वसले आहे. नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूंना वसलेल्या नागरिकांचा जलदगतीने संपर्क होण्यासाठी नदीवर पूल टाकण्यास सुरवात झाली. (17 bridges on Godavari river are coming under flood line nashik news)

सर्वात मोठा पूल व्हिक्टोरिया राणीच्या नावाने तयार केला गेला. पुलावरील ताण कमी करण्यासाठी व्हिक्टोरिया पुलाला समांतर अहिल्यादेवी होळकर पुलाची निर्मिती करण्यात आली.

त्यानंतर शहराचा विस्तार वाढतं गेला त्याप्रमाणे पुलांची निर्मिती होत गेली. २००८ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पूररेषा निश्चित करण्यात आली. निळी व लाल पूररेषा आखण्यात आल्यानंतर गोदावरी व उपनद्यांच्या किनारी लागून असलेल्या मिळकती बाधित झाल्या. त्याप्रमाणे अनेक पूलदेखील पाण्याखाली जात असल्याने ते पूलदेखील पूररेषेबाहेर बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आता पुलांची मुदत संपुष्टात आल्यानंतर नवीन पूल उभारताना लाल पूररेषेबाहेर पुलांची निर्मिती करावी लागणार आहे. सावरकरनगरपासून तसेच जुना पंपिंग स्टेशन येथे सुरु असलेल्या नवीन पुलाचे काम सीपीआरडब्ल्यूच्या नियमानुसार केले जात आहे.

व्हिक्टोरिया व होळकर पूल, कन्नमवार फेज एक व दोन, लक्ष्मीनारायण पूल, चोपडा, टाकळी, टाकळी मलनिस्सारण, नांदूर- मानूर हे पूल पूररेषेबाहेर आहेत. अन्य पुलांची मुदत संपुष्टात आल्यानंतर नवीन नियमानुसार पूररेषेबाहेर पूल तयार करावे लागणार आहे. गोदावरी नदीसह नंदिनी, वालदेवी या नद्यांवर पूल उभारताना पूररेषेच्या बाहेर उभारावे लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ahilya Devi Holkar Bridge Under construction at Godapark.
SAKAL Exclusive: वरुणराजा अजूनही रुसलेलाच! जिल्ह्यातील अवघ्या 12 मंडळांत गाठली सरासरी

गोदावरी नदीवर असलेले पूल

- गंगापूर धरणाजवळील.

- आनंदवली.

- फॉरेस्ट नर्सरी.

- जुने पंपिंग स्टेशन पूल.

-आसाराम बापू पूल.

- चोपडा लॉन्स पूल.

- रामवाडी पूल.

- व्हिक्टोरिया पूल.

-अहिल्यादेवी होळकर पूल.

- दहिपूल.

Ahilya Devi Holkar Bridge Under construction at Godapark.
Sakal Exclusive : वॉटर बँकेचा गवगवा गावभर अन अनुदान कवडीमोल! खर्च साडेतीन लाखावर अन अनुदान केवळ 'इतके'

-संत गाडगे महाराज पूल.

- टाळकुटेश्वर पूल.

- कन्नमवार पूल (एक व दोन)

- लक्ष्मीनारायण पूल.

- टाकळी गाव पूल.

- टाकळी मलनिस्सारण केंद्र पूल.

- नांदूर- मानूर पूल.

नाशिकमधील पहिला टोल

शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला तरी व्हिक्टोरिया पुलाचा वापर सुरू असून, पूल अद्यापही सुस्थितीत आहे. या पुलाचे पैसे वसुल करण्यासाठी नगरपालिकेने त्या वेळी टोल सुरू केल्याची नोंद आहे. नाशिककरांना लागलेला पहिला कर मानला जात आहे. पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याची माहिती ब्रिटिश सरकारकडून राज्य शासनामार्फत महापालिकेला कळविण्यात आली होती.

Ahilya Devi Holkar Bridge Under construction at Godapark.
Sakal Exclusive : गर्भाशय मुखाचा कर्करोग उच्चाटनासाठी चळवळ! सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशनची स्‍थापना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.