Nashik News : मुंबई, नाशिक व इतर शहरांच्या कनेक्टिव्हिटीसाठी भुसावळ- मुंबई लोहमार्गावरील इगतपुरी हे मध्यरेल्वेचे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. इगतपुरी रेल्वेस्थानकाशी महाराष्ट्र व देशातील अनेक शहरे रेल्वेने जोडली गेली आहेत.
परंतु या स्थानकात अनेक रेल्वे गाड्यांना प्रत्यक्ष थांबा असूनही तिकीट बुकिंगची सुविधा नव्हती. आता एकूण सतरा मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे इगतपुरीच्या तिकीट खिडक्यांवर खरेदी करता येतील, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.()
इगतपुरीला इतके दिवस तांत्रिक थांबा होता, कमर्शिअल थांबा नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काही उपयोग होत नव्हता.
या बाबीची मागणी मिळताच सर्व तांत्रिक बाबी तपासून, आता या गाड्यांना देखील इगतपुरीहून तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले आहेत.
असा होणार फायदा
इगतपुरी स्टेशनहून मुंबई, ठाणे, जालना, जळगाव, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक व नागपूर शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
त्याचबरोबर हैदराबाद, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश व इतर राज्यांमधून देखील येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे या सेवेचा फायदा स्थानिक नागरिक, व्यावसायिक, कामगार वर्ग, शेतकरी व विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या सतार मेलची तिकिटे मिळणार
-१२१०९/ १० - सीएसएमटी : मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
- १७६११/१२ - नांदेड - सीएसएमटी : राज्यराणी एक्स्प्रेस
- १५०१७/१८ - गोरखपूर - लोकमान्य टिळक (ट) : काशी एक्स्प्रेस
- १२०७१/७२ - सीएसएमटी - जालना : जनशताब्दी एक्स्प्रेस.
- १२१३९/ ४० - सीएसएमटी : नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस.
- १२८५९/ ६० - हावडा - सीएसएमटी : गीतांजली एक्स्प्रेस
- १२८०९ / १० - हावडा : सीएसएमटी मेल.
- ११४०१/ ०२ - सीएसएमटी - आदिलाबाद : नंदीग्राम एक्स्प्रेस.
- १७०५७/५८ - सिकंदराबाद- सीएसएमटी : देवगिरी एक्स्प्रेस.
- ११०७१/७२ - मुंबई - वाराणसी : कामयानी एक्स्प्रेस.
- २२१७७/ ७८ - सीएसएमटी : वाराणसी महानगरी एक्स्प्रेस.
- १२३३५/३६ - लोकमान्य टिळक (ट) : भागलपूर एक्स्प्रेस.
- १२५३३/ ३४ - सीएसएमटी : लखनौ पुष्पक एक्स्प्रेस.
- ११०२५/ २६ : भुसावळ : पुणे एक्स्प्रेस.
- १८०२९/३० - लोकमान्य टिळक (ट) : शालिमार एक्स्प्रेस.
- २२१८३ - लोकमान्य टिळक (ट) : अयोध्या एक्स्प्रेस.
- २०१०३ - लोकमान्य टिळक (ट) : गोरखपूर एक्स्प्रेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.