Nashik Crime News : बँकेतून 17 लाखांची रोकड भामट्याने केली लंपास

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : बँकेत ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून एकाच्या टेबलावरील १७ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. सदरील घटना पेठरोडवरील एसबीआय बँकेच्या शाखेत घडली असून सदरचा प्रकार बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. (17 lakh cash from SBI bank stolen by fake customer nashik Latest Crime News)

Crime News
Breaking News : धुळ्याहून शिरपूरकडे जाणारा ट्रक पुलावरुन तापी नदीत कोसळला; चालकाचा शोध सुरू

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे प्रबंधक युवराज दौलत चौधरी (रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) यांनी पंचवटी पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, एसबीआय बँकेची पेठफाटा येथे शाखा आहे. गेल्या बुधवारी (ता.२) या शाखेचे कॅशिअर राजेंद्र बोडके यांनी त्यांच्या कॅश काऊंटरमधील जमा केलेली रोख रक्कम मोजून टेबलवर ठेवलेली होती.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचवेळी बँकेत ग्राहक बनून आलेला संशयित भामटा बँकेच्या परिसरात रेंगाळत होता. त्याने बँकेतील कर्मचारी आपआपल्या कामात गुंग असल्याचे बाब हेरली आणि बोडके यांनी काढून ठेवलेल्या रोकडपैकी १७ लाख रुपयांची रोकड त्याच्याकडील पिशवीत टाकून पसार झाला. सदरची बाब बोडके यांच्या उशिरा लक्षात आली.

घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पंचवटी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर तेही बँकेत दाखल झाले. बँकेतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेत पोलिसांनी तपासणी केली. त्यामुळे संशयिताने बँकेतील कर्मचारयांची नजर चुकवून सदरची रक्कम त्याच्याकडील पिशवीत टाकत असल्याचे कैद झाले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक पडोळकर हे करीत आहेत.

Crime News
Nashik Bribe Crime News : सुरगाण्यात ACBच्या कारवाईत तिघेजण जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.