Nashik News: राज्यातील निराधारांना शासनाची दिवाळी भेट; निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान
Nashik News : राज्यातील निराधार योजनेच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या दोन्ही योजनांच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी एक हजार ७०० कोटींचा निधी वितरित केला आहे.
राज्यातील लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ६०० कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत अकराशे कोटी असा एकूण एक हजार ७०० कोटींचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध झाला आहे. (1700 crore subsidy to pension scheme beneficiaries nashik news)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित निधी लाभार्थ्यांना तत्काळ वाटप करावा, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहित महिला, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दीड हजार रुपये दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यास दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.
"संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या योजनांचे स्वरूप विचारात घेऊन या योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर नियोजन करावे. दोन्ही योजनांच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांना वेळेत लाभ देण्यात यावा." - सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.