नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येच नव्हे तर, संपूर्ण राज्यात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्यांची दहशत पालकांमध्ये पसरली होती. प्रत्यक्षात, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसविण्यात आली होती. असे असले तरी, गेल्या दहा महिन्यात नाशिक शहर-परिसरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन १७२ मुली अन् ६६९ महिलांना नाशिक पोलिसांनी शोधून आणत त्यांची घरवापसी केली. बेपत्ता वा अपहरणाच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण ७० ते ८० टक्के आहे. (172 girls 669 women Missing or abducted searched by police Nashik News)
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये लहान मुले पळविणारे समजून तीन घटनांमध्ये सामान्य नागरिकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याच दरम्यान, सोशल मीडियावर लहान मुलांच्या अपहरण करणाऱ्या टोळ्यासंदर्भात अफवा पसरविल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण होते. तर दुसरीकडे पोलिस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल होत असल्याने त्याचा संदर्भ अपहरण टोळ्यांशी जोडला जात असल्याने पोलिसांसमोर सदरची बाब डोकेदुखी उभी राहिली होती.
प्रत्यक्षात, अल्पवयीन मुली या प्रेमसंबंध वा कौठुंबिक कलहातून स्वत:हून घर सोडून जात असल्याने मुख्य कारण या गुन्ह्यांच्या तपासातून समोर येते आहे. परंतु पोलिसात याप्रकरणी कायद्यान्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. नाशिक गुन्हेशाखेसह पोलीस ठाणे निहाय तपासी पथकांनी गेल्या १० महिन्यांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरणाच्या गुन्हांचा आणि १८ वर्षावरील बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
यात, शहर पोलिसांना यश आले असून, या १० महिन्यांमध्ये १८ वर्षांआतील घरसोडून गेलेल्या ४७ मुलांपैकी ४२ तर, २११ मुलींपैकी १७२ मुलींना शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. याचप्रमाणे, १८ वर्षावरील बेपत्ता असलेल्या ६७५ पुरुषांपैकी ४९१ आणि ८२५ महिलांपैकी ६६९ महिलांचा पोलिसांनी शोध घेत त्यांची घरवापसी केली. यासंदर्भातील माहिती गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.
ऑक्टोबर २०२२ अखेरची आकडेवाडी
अपहृत मुले : ४७
शोधलेले मुले : ४२
अपहृत मुली : २११
शोधलेल्या मुली : १७२
बेपत्ता पुरुष : ६७५
शोधलेले पुरुष : ४९१
बेपत्ता महिला : ८२५
शोधलेल्या महिला : ६६९
"शहर हद्दीमध्ये लहान मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी टोळीविरोधात गुन्हा नाही. ती केवळ अफवा होती. प्रत्यक्षात शहर पोलीस आणि निर्भयाच्या पथकांनी मेहनत घेऊन अपहृत मुले-मुली, महिला-पुरुषांचा शोध घेत त्यांना त्यांच्या घरी परत आणले आहे."
- अमोल तांबे, पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा, नाशिक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.