Nashik News: कृषी सेवेच्या 174 गट-ब अधिकाऱ्यांना राज्यामध्ये तंत्र अधिकारीपदी पद्दोन्नती

नाशिक विभागातील २८ अधिकाऱ्यांचा समावेश
Promotion
Promotionesakal
Updated on

Nashik News : राज्याच्या कृषी विभागाने आपल्या सेवेतील १७४ गट-ब अधिकाऱ्यांना तंत्र अधिकारीपदी पद्दोन्नती दिली आहे. त्यामध्ये नाशिक विभागातील २८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तसेच नांदगावचे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांची नाशिकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कृषी उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे. (174 Group B Officers of Agriculture Service promoted as Technical Officers in State Nashik News)

नाशिक विभागातील पद्दोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे असून (कंसात पद्दोन्नती मिळालेले कार्यालय दर्शवते) : सोलापूरचे राजेंद्र बनसोडे (नंदूरबार जिल्हा अधीक्षक), त्र्यंबकेश्‍वरचे अभिजित अहिरराव (नाशिकचे बीज प्रमाणीकरण), जुन्नरचे दत्तात्रय जाधव (नगरचे जिल्हा अधीक्षक),

नगरचे धनंजय हिरवे (नेवासा तालुका), पाथर्डीचे अमोल काळे (श्रीरामपूरचे उपविभागीय), पेठचे मुकेश महाजन (नाशिकमधील रामेती), पाथर्डीचे रामदार मडके (इगतपुरी तालुका), कळवणचे श्रीरंग वाघ (नाशिकचे रामेती), कोपरगावचे मनोज सोनवणे (कोपरगाव), नाशिकचे अभिजित घुमरे (नाशिक उपविभागीय),

सुपाचे गजानन घुले (पारनेर), रायगडचे भाऊसाहेब वाळके (रावेर), कोपरगावचे अविनाश चंदन (श्रीरामपूर), दिंडोरीचे ज्ञानेश्‍वर नाठे (सिन्नर), नगरचे सिद्धार्थ क्षीरसागर (नगर), राहुरीचे जयंत जाधव (नाशिक प्रयोगशाळा), अमळनेरचे दीपक साळुंखे (चोपडा), चांदवडचे अमित भोसले (छत्रपती संभाजीनगर),

नाशिकचे नीलेशकुमार भदाणे (जालना), दिंडोरीचे ललित सूर्यवंशी (मलकापूर), लासलगावचे दीपक सोमवंशी (जव्हार), नाशिकचे लितेश येळवे (यवतमाळ), नाशिकच्या क्रांती तोरवणे (वर्धा), नाशिकच्या सुप्रिया नागरे (गोंदिया).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Promotion
Nashik News: रिंगरोडसाठी राज्य शासनाने माहिती मागविली; सिंहस्थाच्या कामाला वेग

शहराचे नाव बदलले पण इतरत्र कायम

कृषी विभागाच्या पद्दोन्नतीच्या आदेशामध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशीव असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र महसूल विभागाचे नाव औरंगाबाद असे नमूद करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने चौकशी केल्यावर औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाले आहे, परंतु विभागासह इतर कार्यालयांचे स्थळ औरंगाबाद असे कायम असल्याची माहिती पुढे आली.

Promotion
Mission Bhagirath Prayas : जिल्ह्यात मिशन भगीरथ प्रयासतंर्गत ३१ कामे पूर्ण : डॉ. गुंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.