Nashik Cyber Crime: ‘वर्क फ्रॉम होम’ च्या नादात गमावले 18 लाख; सायबर गुन्हेगाराकडून महिलेची फसवणूक

cyber crime
cyber crimeesakal
Updated on

Nashik Cyber Crime : ऑनलाइन ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून भरघोस आर्थिक कमाईचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराला एका महिलेला तब्बल १८ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांमध्ये अशारीतीने फसवणुकीचे प्रकार वाढले असून, अशा बोगस जाहिरातीपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. (18 Lakhs lost to work from home Woman cheated by cyber criminal Nashik Cyber ​​Crime)

पूनम हितेश कुकडे (रा. खुटवडनगर, सिडको) या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या टेलिग्राम या ॲपवरुन वर्क फ्रॉम होम करा आणि लाखो रुपये कमवा, अशी जाहिरात दिसली. त्यांनी गेल्या मार्च महिन्यात वर्क फ्रॉम होमच्या या जाहिरातीला प्रतिसाद दिला.

त्यानुसार सायबर भामट्याने त्यांना लिंक पाठविली. लिंकवर माहिती दिल्यानंतर त्यांना एका बँक खात्यावर ऑनलाइन पैसे भरण्यास सांगून प्रश्न पाठविले. देण्यात आलेला टास्क पूर्ण करत असताना पूनम यांच्या मोबाईल लिंक असलेल्या टेलिग्रामच्या खात्यात रिव्ह्यू पूर्ण केल्याचे गुण दाखवून त्या मोबदल्यात रक्कम क्रेडीट होत असल्याचे दाखविले.

खात्यात पैसे जमा होत असल्याची खात्री झाल्याने पूनम यांनी महिनाभर रिव्ह्यू पूर्ण करण्यासाठी सायबर भामट्याने सांगितल्यानुसार ३ ते २७ मार्च या कालावधीत विविध २४ बँक खात्यांवर एकूण १८ लाख १८ हजारांची रक्कम भरली.

त्यामुळे त्यांना संबंधित संशयित खातेधारकांकडून प्रश्न सोडविण्यासाठी डझनभर प्रश्न पाठविण्यात आले. पूनम यांनी प्रश्नांची उत्तरे दिली असता रिव्ह्यू पूर्ण होण्यासाठी लागणारा शेवटचा प्रश्न गहाळ केला जात होता.

त्यामुळे रिव्ह्यू पूर्ण झाले नाही. संबंधित सायबर भामट्याने नवीन प्रश्नावली टाकत त्या-त्या प्रश्नांची रक्कम ठरवून दिली होती. जी रक्कम भामट्याने सांगितली, ती विविध खात्यांवर त्यांनी भरली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cyber crime
Jalgaon Crime News : दंगलीतील संशयिताचा कारागृहात मृत्यू; अमळनेरमध्ये तणावपूर्ण शांतता..

मात्र, बँक खात्यात रक्कमच दिसत नसल्याचे पाहून पूनम यांना संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहर सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली.

त्यानुसार कोटक महिंद्रा, येस बँक, आयसीआयसीआय व एचडीएफसीच्या संशयित खातेधारकांची माहिती सायबर पोलिसांकडून तांत्रिक माहितीद्वारे घेतली जात आहे. याप्रकरणी २४ संशयित खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"कोणत्याही आमिषाला बळी न पडता, ऑनलाइन जॉबबाबत सावधगिरी बाळगावी. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (NCCRP) वरील www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर आणि सायबर हेल्पलाइन नंबर 1930 यावर तक्रार नोंदवावी. तसेच, नजीकच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

cyber crime
Dhule Crime News : धुळे पोलिसांनी हस्तगत केल्या चोरीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू; अनेक दुकानदारांना गंडविल्याचे उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()