नाशिक : १८ हजार कुटुंबीयांना मिळणार घरटं!

तालुकानिहाय उद्दिष्ट निश्‍चित; अनुसूचित जमातीला सर्वाधिक १४ हजार घरकुले
Home
HomeSakal
Updated on

येवला : आर्थिक दुर्बल व मागास घटकांना हक्काचा निवारा देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे आगामी वर्षाचे तालुकानिहाय उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात तब्बल १८ हजार ६६८ घरकुले आगामी वर्षात बांधली जाणार असून, यामुळे निवाऱ्याच्या शोधातील या कुटुंबीयांना हक्काचं घर मिळणार आहे.

Home
Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

यापूर्वी इंदिरा आवास घरकुल योजना या नावाने राबविली जाणारी ही योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. यापूर्वीच्या ‘ब’ यादीतील सर्वच घरकुले पूर्ण झाली असल्याने ‘ड’ यादीसाठी दोन वर्षांपूर्वी नव्याने सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार निश्‍चित करण्यात आलेली यादी आवास सॉफ्टवेअर प्रणालीवर संवर्गनिहाय नोंदवली होती. आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभासाठी तालुकानिहाय उद्दिष्टांचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमाती व इतर संवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अल्पसंख्याक गटासाठी राज्य व्यवस्थापन कक्षाकडून उद्दिष्ट प्राप्त झाल्यावर अल्पसंख्याक लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत असून, ग्रामीण भागातील दारिद्य्र रेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबीयांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देऊन हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला जातो. घरकुलासाठी ग्रामपंचायतीमार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते. त्यासाठी लाभार्थी दारिद्य्र रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.

Home
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी एक लाख २० हजारांचे अनुदान देण्यात येते. लाभार्थ्यांना हे अर्थसहाय थेट बँकेत मिळते. याव्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे १२ हजारांचा निधीही उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे लाभार्थ्याला हक्काचे व टुमदार घर मिळते. योजनेच्या जिल्हा कार्यालयाने निश्‍चित केलेल्या या उद्दिष्टानुसार सर्वाधिक घरकुले कळवण, मालेगाव व दिंडोरी तालुक्यांच्या पदरात पडणार आहे. त्याखालोखाल सुरगाणा, येवला व नांदगावला लाभ होणार असून, सर्वांत कमी घरकुले देवळा, नाशिक व सिन्नर तालुक्यांना मिळणार आहेत.

असे आहे घरकुल उद्दिष्ट...

तालुका इतर -अनु.जाती -अनु.जमाती- एकूण

बागलाण ३०९ - ७८ - १०६३ - १४५०

चांदवड २४१ - ४० - ५३८ - ८१९

देवळा १२७ - २२ - २९४ - ४४३

दिंडोरी ४२४ - १०४ - १४२० - १९४८

इगतपुरी ३३५ - ६७ - ९१८ - १३२०

कळवण २५७ - ११५ - १५७२ - १९४४

मालेगाव ५७९ - ९४ - १२८१ - १९५४

असे आहे घरकुल उद्दिष्ट...

नांदगाव - ३८२ - ६३ - ८५८ - १३०३

नाशिक १०१ - २७ - ३६२ - ४९०

निफाड २५३ - ४१ - ५५७ - ८५१

पेठ २० - ८४ - ११४८ - १२५२

सिन्नर १५३ - २५ - ३३७ - ५१५

सुरगाणा ६० - ९६ - १३०८ - १४६४

त्र्यंबकेश्‍वर १५३ - १०० - १३५६ - १६०९

येवला ३८१ - ६३ - ८६२ - १३०६

एकूण ३७७५ - १०१९ - १३८७४ - १८६६८

पंतप्रधान घरकुल योजनेची ‘ड’ यादी शासनाकडून मंजूर झाली आहे. त्यात क्रमांकानुसारच घरकुलाचा लाभ दिला जात आहे. मात्र, हा क्रमांक ठरवण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना मिळाला पाहिजे. त्यामुळे ज्या लाभार्थ्याला तत्काळ घराची गरज आहे, त्यांना तो लाभ ग्रामपंचायत देऊ शकते. याबाबत सर्वच सरपंचांकडून मागणी होत आहे. याची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार आहे.

-प्रवीण गायकवाड, सभापती, पं. स. येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.