‘१९६७ पूर्वीच्या आडनावामधील जातीचा पुरावा ग्राह्य धरावा’

जातीचे प्रमाण सिद्ध करणारे पन्नास वर्षांपूर्वीचे कागदपत्रांची मागणी
‘१९६७ पूर्वीच्या आडनावामधील जातीचा पुरावा ग्राह्य धरावा’
Updated on

जुने नाशिक : १९६७ पूर्वीच्या आडनावामधील जातीचा उल्लेख असलेला पुरावा (Proof)ग्राह्य धरावा, अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन ट्रस्टतर्फे (All India Muslim O.B.C. Organisation)जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अधिकाऱ्यांना(Divisional Caste Certificate Scrutiny Committee) देण्यात आले.

‘१९६७ पूर्वीच्या आडनावामधील जातीचा पुरावा ग्राह्य धरावा’
नाशिक : कोरोना सेल्फ किट खरेदी करताना आधारकार्ड बंधनकारक

जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. जातीचे प्रमाण सिद्ध करणारे पन्नास वर्षांपूर्वीचे कागदपत्रांची मागणी होते. बहुतांशी जणांकडे जुने कागदपत्र नसल्याने त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये अडचण येत असते. पूर्वी आडनाव मध्येच जातीचा उल्लेख असायचा. जातीनिहाय असलेल्या व्यवसायावरून आडनाव असतं. आजही बहुतांशी नागरिकांकडे त्या आशयाचे पुरावे आहेत.

‘१९६७ पूर्वीच्या आडनावामधील जातीचा पुरावा ग्राह्य धरावा’
‘महाविकास’चा झेंडा;नाशिक जिल्ह्यात सरशी

अशा वेळेस जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र पडताळणी करत असताना संबंधित अर्जदार नागरिकाचे १९६७ पूर्वीचे आडनावात जातीचा उल्लेख असलेले पुरावे समितीने ग्राह्य भरावे. त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा मार्ग सुकर करण्यात यावा. जेणेकरून त्यांना शैक्षणिक, नोकरी संबंधित कामांमध्ये अडचणी येणार नाही, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन ट्रस्टतर्फे करण्यात आली. बुधवारी (ता. १९) मागणीचे निवेदन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी ऑर्गनायझेशनचे जिल्हा अध्यक्ष तन्वीर खान(तांबोळी), प्रवक्ता फय्याज पठाण, संघटक तौसिन मणियार, उपाध्यक्ष वकील शेख, निसार शेख, अतिक गाजी, सिरील अभंग, ताहेर शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.