Nashik Crime : ऐन संक्रांतीच्या सणासुदीत गोराणेत दोन दिवसांत 2 घरफोड्या

बागलाण तालुक्यातील गोराणे येथे सलग दोन दिवसांत दोन घरफोड्या झाल्याने चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
2 burglaries in two days in Gorane during during Sankranti festival
2 burglaries in two days in Gorane during during Sankranti festivalesakal
Updated on

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील गोराणे येथे सलग दोन दिवसांत दोन घरफोड्या झाल्याने चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून घरात कुणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन रात्रीतून संक्रांत साजरी केली.

जायखेडा पोलिसांनी फिगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण केले होते. चोरट्यांचा लवकर छडा लावण्यात यश मिळेल असा विश्वास पोलिसांकडून केला जात आहे. (2 burglaries in two days in Gorane during during Sankranti festival Nashik Crime)

  गोराणेतील लताबाई संजय भामरे यांच्या घरात दोन दिवसापूर्वी सोनं, चांदी व पन्नास हजार रोख रक्कम असा तीन ते साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

दुसरा दिवस उजाडला तोच विलास नामदेव देसले यांच्या बंगल्यात वाॅल कंम्पाऊडवरून उड्या घेत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तसे लोखंडी हत्याराने वरील दरवाजा तोडण्यात आल्याचे दिसून आले.

श्री. देसले हे पुणे येथे नोकरीत असल्याने निश्चित चोरट्यांनी कशावर हात मारला हे मात्र समजू शकले नाही. जायखेडा पोलिसांत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांनी श्वान पथक व फिगर्स प्रिंट पथकाला पाचारण केले होते.

2 burglaries in two days in Gorane during during Sankranti festival
Nashik Crime : शहरात दुचाकी चोरटे आहेत तरी किती? अट्टल चोरटे जेरबंद करूनही ‘सिलसिला’ कायम

दोन्ही घरफोड्या एकाच चोरट्यांनी केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. पोलिस चोरट्याच्या मागावर असून लवकरच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या जातील असे उपस्थित ग्रामस्थांना पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून जायखेडा पोलिसांनी गावात गस्त वाढवावी अशी मागणी सरपंच दिनेश देसलेसह यशवंत देसले, सुनिल जाधव, चिंतामण देसले आदि ग्रामस्थांकडून केली जात आहे

2 burglaries in two days in Gorane during during Sankranti festival
Sand Mafiya Crime: वाळू माफिया मोकाट! कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी, दोन दिवसांत दुसरी घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.