NMC News : श्वान निर्बीजीकरणासाठी 2 ठेकेदार! महासभेवर जादा विषयात प्रस्ताव मंजूर

ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने श्वान निर्बीजीकरण ठेका रद्द केल्यानंतर १ कोटी रुपये खर्च करून नवीन ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
NMC news
NMC newsesakal
Updated on

नाशिक : ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने श्वान निर्बीजीकरण ठेका रद्द केल्यानंतर १ कोटी रुपये खर्च करून नवीन ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी एक तर सिडको, सातपूर, पूर्व व पश्चिम विभागासाठी दुसरा स्वतंत्र ठेकेदार यासाठी नियुक्त केला जाणार आहे. (2 contractors for dog sterilization Proposals approved in General Assembly on additional subjects NMC News nashik)

२००७ पासून महापालिका हद्दीत भटक्या व मोकाट श्‍वानांवर निर्बीजीकरण प्रक्रिया केली जाते. मागील पंधरा वर्षात १ लाखांहून अधिक मोकाट श्‍वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. निर्बीजीकरणासाठी महापालिकेकडे स्वतःची यंत्रणा नाही.

त्यात बंधनकारक करण्यात आल्याने महापालिकेकडून आउट सोर्सिंग केले जाते. भटक्या श्‍वानांना पकडल्यानंतर विल्होळी जकात नाका येथे शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेथून श्‍वान पकडले, तेथे पुन्हा सोडावे लागते.

तीन वर्षाचा ठेका संपल्यानंतर मे २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया पार पडली. चार वेळा पुनर्निविदा प्रक्रिया पार पडली. जून महिन्यात काम देण्यात आले. ज्या वेळी काम दिले गेले, त्या वेळीदेखील वाद निर्माण झाला.

६५० रुपयांऐवजी ३५ टक्के वाढ करून ९९८ रुपये प्रतिश्‍वान दर निश्‍चित करण्यात आला. प्रतिश्वान ३४८ रुपये दरवाढ दिली गेली. सहा महिन्यात चार हजार ८९६ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले.

जून महिन्यात ८१३, जुलैमध्ये ८८४, ऑगस्ट ८७६, सप्टेंबर ७९२, ऑक्टोबर ८५९, नोव्हेंबर महिन्यात ६५२ याप्रमाणे श्‍वान निर्बीजीकरण झाले. दरम्यान, ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र महापालिकेला सादर करणे बंधनकारक होते.

NMC news
NMC News : महापालिकेच्या 400 सुरक्षारक्षकांना मुदतवाढ

या मुदतीत संबंधित मक्तेदाराने महापालिकेला प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे सदर ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला. पशुसंवर्धन विभागाने नवीन ठेक्यासाठी महासभेच्या पटलावर जादा विषयात प्रस्ताव सादर केला.

त्यास मंजुरी मिळाली. नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी स्वतंत्र ठेका दिला जाणार असून यासाठी ४० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तर सिडको, सातपूर, पूर्व व पश्चिम विभागासाठी दुसरा ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. त्यासाठी ६० लाखांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली.

निर्बिजिकरणावर संशय, सीसीटीव्ही कॅमेरे

श्‍वान निर्बीजीकरण करूनही मोकाट श्‍वानांची संख्या वाढत असल्याने निर्बीजीकरणावर संशय व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे निर्बिजीकरण मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी डॉग स्कॉड सोबत असलेल्या श्वान वाहनावर जीपीएस यंत्रणा बसविली जाणार असून श्‍वान निर्बिजीकरण केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NMC news
NMC News : विद्युतदाहिन्यांचा भार महापालिकेवर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.