नामपूर (जि. नाशिक) : यंदाच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांना रिक्त शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी उद्यापर्यंत (ता.२६) शासनाने मुदतवाढ दिली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बागलाण तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात सर्वाधिक गावे रिक्त असल्याने शिक्षकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे मळभ दाटले आहे.
एका शिक्षकाला एक-दोन नव्हे तर तब्बल तीस शाळांचा विकल्प भरावा लागत असल्याने भविष्यात ज्ञानदानासाठी कोणती शाळा मिळेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असून बदलीपात्र शिक्षकांच्या तालुकानिहाय बैठकांमध्ये बदलीबाबत कल जाणून घेतला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (2 days extension for teacher transfers nashik news)
बागलाण तालुक्यात जवळपास शिक्षकांच्या ७० जागा रिक्त असून बदलीपात्र शिक्षकांची संख्या मात्र ३४ इतकी आहे. परंतु बहुतांश शाळा दुर्गम भागात असल्याने भविष्यात शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात जवळपास एका वर्षाच्या विलंबाने ऑनलाइन बदली प्रक्रिया विंसिस सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून राबविली जात आहे. जिल्हा बदली झाल्यानंतर संवर्गनिहाय ऑनलाइन बदल्या केल्या जात आहेत.
संवर्ग १ आणि २, ३ च्या बदल्या झाल्यानंतर सध्या संवर्ग ४ मधील शिक्षकांची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावे समानीकरणाच्या नावाखाली लॉक झाल्याने शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे
अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या बागलाण तालुक्यातील शिक्षकांना बदली प्रक्रियेचा लाभ न मिळाल्याने त्यांच्यातही नाराजीचा सूर आहे. २०१८ मध्ये ग्रामविकास खात्यामार्फत शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवण्यात आली होती.
त्यात अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र असे दोन भाग करण्यात आले. त्यानुसार सोपे क्षेत्रात १० वर्ष व अवघड क्षेत्रात ३ वर्ष सेवा केल्यानंतर शिक्षक बदलीपात्र होणार असे शासन निर्णयात सांगण्यात आले होते.
सदर शासन निर्णयानुसार महिला शिक्षकांना अवघड क्षेत्रात लेडीज अनफिट एरिया म्हणून १ वर्षात बदली करता येणार होती. तसेच सर्व रिक्त जागा, बदलीपात्र शिक्षकांच्या जागा अवघड भागातून बदली साठी दिल्या जातील असे शासन निर्णयात सांगण्यात आले होते.
परंतु, सन २०२२-२३ मधील बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रासंदर्भातील सर्व निकष बदलून तालुका मुख्यालयापासून ४५ ते ६० किलोमीटरहून अंतरावरील अतिदुर्गम भागातील अवघड म्हणून घोषित केलेली
गावे सोपे करून, महिला शिक्षकांना प्रतिबंधक क्षेत्र रद्द करून, तसेच जिल्हा स्तरावरील रिक्त जागांवरील अधिकार रद्द करून बदली प्रक्रिया शासन स्तरावरून राबविण्यात येत आहे.
बदल्यांचे नवीन वेळापत्रक असे
- संवर्ग ४ मधील शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे : २६ जानेवारी
- पोर्टलद्वारा बदली प्रक्रिया राबविणे : ३१ जानेवारी
- रिक्त गावांची यादी प्रसिद्ध करणे : १ फेब्रुवारी
- विस्थापित शिक्षकांसाठी बदली राउंड राबविणे : २ ते ७ फेब्रुवारी
- विस्थापित शिक्षकांची सॉफ्टवेअरद्वारा प्रक्रिया राबविणे : १२ फेब्रुवारी
- मुख्य कार्यकारी अधिकारी द्वारा रिक्तपदे जाहीर करणे : १३ फेब्रुवारी
- सुगम भागात सलग दहा वर्षे काम केलेले बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे : १४ फेब्रुवारी
- अवघड भागातील जागा शिक्षकांद्वारा प्राधान्यक्रमाने भरणे : १५ ते १८ फेब्रुवारी
-सॉफ्टवेअर द्वारा बदली प्रक्रिया राबविणे : १९ ते २२ फेब्रुवारी
- बदली आदेश प्रकाशित करणे : २३ फेब्रुवारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.