कृत्रिम हात मिळाल्याने दोघांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

Divyang
Divyangesakal
Updated on

उमराळे (जि. नाशिक) : हौसला संस्था व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कृत्रिम प्रोस्थेटिक हात बसविण्यात आले. त्यामुळे या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली व गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे उपस्थितीत रोशन चौधरी व किर्ती लोखंडे यांना कृत्रिम हात बसविण्यात आला.

हौसला संस्था दिव्यांग मुलांच्या शिक्षण, पुनर्वसनासाठी कार्यरतत आहे. जिल्ह्यातील एक किंवा दोन्ही हात नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली. शहरातील हौसला संस्था त्यांच्या मदतीला धावून आली. या विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे कृत्रिम हात मिळवून देण्यासाठी कॅडबरी सामाजिक संस्था, सोशल हार्डवेअर संस्था बंगळूर यांचे सहकार्य घेऊन मोजमाप शिबिर घेण्यात आले. मोजमापासाठी थ्री डी स्कँनर तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करण्यात आला.

Divyang
मुलीच्या लग्नासाठी पैसे हवेत? 'या' योजनेतून सरकार देणार 65 लाख

दिंडोरी येथे झालेल्या शिबिरासाठी सोशल हार्डवेअर संस्थेचे संचालक अभितकुमार किशोर, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, जिल्हा समन्वयक सुरेखा पाबळकर, विशेषतज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, विशेष शिक्षक गणेश सूर्यवंशी, पौर्णिमा दीक्षित, बिपिन भामरे, अश्विनी जाधव, प्रशांत बच्छाव, वैशाली तरवारे, श्रीकांत खलाने आदी उपस्थित होते.

Divyang
गर्भवती महिलांना केंद्र सरकार देणार पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.