Nashik News : दारणा नदीत 2 जण बुडाले; महापालिकेचे अग्निशमन दलाचे; शोधकार्य सुरू

Chehedi: Firefighters and lifeguards of the municipal corporation while searching in Darna river bed
Chehedi: Firefighters and lifeguards of the municipal corporation while searching in Darna river bedesakal
Updated on

Nashik News : चेहेडी येथील दारणा नदी वरील महापालिकेच्या चेहेडी बंधा-यात नदी पात्रात्र सिन्नरफाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने दोन जण बुडाले. रविवारी दिवसभर त्यांचा शोध घेतला.

त्यातील एक जण सिध्दार्थ गांगुर्डे सापडला परंतु राहुल महानुभाव अतापर्यत मिळू शकला नाहीत अग्निशमन दला आणि जीवरक्षका कडून शोधकार्य सुरु आहेत. (2 drowned in Darna River Municipal Fire Brigade Search begins Nashik News)

चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु असून नाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधा-याचे काही गेट उघडण्यात आले आहे, शनिवारी (ता.१०) दुपारी तीन च्या सुमारास चार युवक अंघोळीसाठी सिद्धार्थ गांगुर्डे (१७), राहूल महानुभाव (१८), संतोष मुकणे व आर्यन जगताप गेले होते, त्यातील तीघांनी नदी पात्रात्र उड्या मारल्या त्यांतील एक जण किनाराला आला सिद्धार्थ गांगुर्डे व राहूल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले होते.

त्यांनी बाहेर निघण्यासाठी मदत मागितली मात्र तो पर्यंत त्यांचा दम झाल्याने ते बुडाल्याचे दोन तीन तासाने त्यांचे सहकारी संतोष मुकणे यांने घरी येवून सांगितले. त्यांनी त्वरीत आग्निशमन दलास कळविले अग्निशमन दलाचे जवानी शोध मोहिम सुरु केली.

Chehedi: Firefighters and lifeguards of the municipal corporation while searching in Darna river bed
Water Wastage News : चाळीसगावात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; पालिका करणार कारवाई

रात्री उशिरा झाल्याने शोध मोहिम थांबविली होता ती रविवार ता. ११ रोजी पुन्हा सुरु केली. यावेळी माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांनी सातपुर परिसरातील डबाळे, गंगापुर, पंचवटी येथील जीवरक्षक बोलावून शोध घेतला. तसेच अग्निशमन दलाच्या वतीने पाण्याच बोट टाकून शोध घेण्याचे काम सुरु आहेत.

सिध्दार्थ् गांगुर्डे् चे वडील माथाडी कामगार आहेत घरात आई वडील, आजोबा, बहीण राहतात. राहुल महानुभव यांचे वडील मोलमजुरीचे काम करतात. त्याला आई, वडील, एक भाऊ, बहीण आहेत तो सिन्नरफाटा येथे नातेवाईकांकडे राहत होता. दिवसभर सिध्दार्थ् व राहुल चे नातेवाईक, मित्र परिवार आणि परिसरातील नागरिक नदी किनारी बसलेले होते.

Chehedi: Firefighters and lifeguards of the municipal corporation while searching in Darna river bed
Nashik Marathi School : शाळेची पटसंख्या टिकविताना दमछाक; विद्यार्थी शोधण्यात शिक्षक गर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.