Nashik Crime : आता महागड्या कारवरही चोरट्यांचा डोळा; 4 दिवसात 2 महागड्या कार चोरीला

car theft
car theft esakal
Updated on

नाशिक : शहर परिसरातून दुचाक्या लंपास करण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना, आता वाहन चोरट्यांनी आपला मोर्चा महागड्या कारकडे वळविला आहे. गंगापूर रोड परिसरातून महागडी चोरीला गेली असतानाच, आता पंचवटीतूनही ८ लाखांची क्रेटा कार चोरट्याने चोरून नेली आहे. त्यामुळे वाहनमालकांची झोपच उडाली आहे. (2 expensive cars stolen in 4 days Nashik Latest Crime News)

सत्यानंद चंद्रकांत ठाकर (रा. रामचंद्र अपार्टमेंट, मखमलाबाद नाका) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची ८ लाख रुपयांची पांढरया रंगाची क्रेटा कार (एमएच १५ जीए ७२९०) मखमलाबाद नाक्यावरील पंचवटीतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या मोंघीबाई धर्मशाळाजवळ पार्क केली होती.

गेल्या मंगळवारी (ता.१८) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सदरील महागडी कार चोरून नेली आहे. दोन दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरातूनही ७ लाख रुपयांची क्रेटा कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. अद्यापही या कारचा तपास लागू शकलेला नाही.

car theft
Anand Mahotsav 2022 | शास्त्रीय संगीत टिकविण्यासाठी प्रयत्नांची गरज : सचिन चंद्रात्रे

विजय रंगनाथ हळदे (रा. वेदांत रेसीडेन्सी, मखमलाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची २५ हजार रुपयांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ डीक्स ०७८३) त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने गेल्या १ जून २०२२ रोजी मध्यरात्री चोरून नेली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, शेखर राजेंद्र चव्हाण (रा. महालक्ष्मी चाळ, वडाळानाका) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची ३० हजार रुपयांची अॅक्टिवा मोपेड दुचाकी (एमएच १५ जीएन ५४६१) द्वारका येथील शहीद भगतसिंग चौकात असलेल्या टेमलाई माता मंदिरासजवळ पार्क केली होती. गेल्या रविवारी (ता.१६) सकाळी दहा वाजता अज्ञात चोरट्याने सदरील अॅक्टिवा चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

car theft
Nashik Crime News : चोऱ्या- घरफोड्या जोमात; शहर पोलीस कोमात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.