Nashik Crime News : शहरात जबरी चोऱ्या अन् घरफोड्यांनी गाठला कळस!

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी खेचण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. एकाच दिवशी दोन सोनसाखळी खेचण्याच्या घडल्या असून, सव्वा दोन लाखांचा ऐवज हिसकावून नेला, तर भद्रकालीत एकाची जबरीने लुटमार करण्यात आल्याची घटना घडली. तर दुसरीकडे दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

या घटनांमुळे दिवसेंदिवस वाढत्या जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढता असून, शहर पोलिसांकडून गुन्ह्यांची उकल होत नसल्याने गुन्ह्यांनी कळस गाठल्याचे चित्र आहे. (2 incidents of chain pulling in one day theft robbery burglary nashik crime News)

सुरेखा रामनाथ जाधव (रा. रेश्मानंद पार्क, जाणता राजा कॉलनी, मखमलाबादरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या शनिवारी (ता. ७) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास महादेव कॉलनीतील सुंदरबन बंगल्यासमोरून त्यांच्या पतीसमवेत पायी जात होत्या.

त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी जाधव यांच्याजवळ येत गाडी हळू केली आणि पाठीमागे बसलेल्या संशयिताने जाधव यांच्या गळ्यातील दोन लाखांची सोन्याची पोत बळजबरीने ओढून पोबारा केला.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यत आला असून, सहायक निरीक्षक एस.जी. डंबाळे हे तपास करीत आहेत. तर, दुसरी घटना म्हसरुळ हद्दीत घडली. वैशाली गोकूळ तिडके (रा. साईगणेश अपार्टमेंट, स्वामीनगर, मखमलाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता. ७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अमुल आईस्क्रिम पार्लरसमोरून मंदिराकडे जात होत्या.

Crime News
Nashik Crime News : मालेगावला दहा हजाराची कुत्ता गोळी जप्त

त्यावेळी समोरून पांढर्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने तिडके यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून शांतीनगरच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक व्ही.डी. आहिरे हे तपास करीत आहेत.

तर, भद्रकालीतील तलावडीत एकाची लुटमार केल्याची घटना घडली. गजानन रामभाऊ झरेकर (रा. स्नेहल हाईटस्‌, रामकृष्णनगर) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या शनिवारी (ता. ७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास तलावडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ त्यांची मोपेड उभी करून उभे होते.

त्यावेळी अनोळखी दोन संशयित त्यांच्याजवळ आले आणि अचानक एकाने त्यांना पकडून ठेवले तर दुसर्याने बळजबरीने त्यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून सात हजार काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक किशोर खांडवी हे तपास करीत आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Crime News
Jalgaon Crime News : पोलिस ठाण्यातून संशयित निसटले; शस्त्र, रॉडचा वापर, तरी हाणामारीच दाखल

दोन घरफोड्या

सचिन विठोबा फापाळे (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे सातपूर औद्योगिक वसाहतीतील गोल्डी कंपनीजवळ शॉप आहे. गेल्या ७ डिसेंबर ते ६ जानेवारी या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या शॉपच्या शटरच्या गॅपमधून आत शिरून सीसीटीव्ही बंद केले आणि दुकानातून ३० हजारांचे पितळी टर्मिनल व स्क्रॅप, ॲल्युमिनियमच्या पट्ट्या, पाच किलोचे तांबे असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

याप्रकरणी सातपूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, देवयानी उल्हास देशमुख (रा. स्वागतव्हिला, गुलमोहर कॉलनी, ध्रुवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या त्यांच्या पतीसमवेत मूळगावी परभणी येथे कामानिमित्ताने गेल्या होत्या. दरम्यान त्यांचा २० हजार रुपयांचा टॅब अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरातून ३ ते ६ तारखेदरम्यान चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nashik Crime News : 2 तडीपार गुंडांना अटक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.