Nashik News: 2 लाख भाविक सप्तश्रृंगीच्या चरणी नतमस्तक; भाविकांनी साधली दिवाळीच्या सुट्ट्यांची पर्वणी

Devotees thronged the steps of Sri Bhagwati temple for darshan.
Devotees thronged the steps of Sri Bhagwati temple for darshan.esakal
Updated on

वणी : आदिमाया सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांची पर्वणी साधत आठ दिवसात लाखो भाविक सप्तश्रृंगीदेवी चरणी नतमस्तक झाले.

या गर्दीमुळे चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव आणि कावडयात्राप्रमाणे गडाला दिवाळी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रविवारी (ता. १९) २५ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. (2 lakh devotees bow at feet of Saptashringi Devotees celebrated Diwali holidays Nashik News)

गुजरातसह महाराष्ट्रातील भाविक दिवाळीच्या सुट्टीचा योग साधून गडावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. भाऊबीज संपल्यानंतर सप्तश्रृंगीगडावर भाविकांची गर्दी वाढत आहे.

त्यातच त्रिपुरारी पौर्णिमा साईबाबांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जात असल्याने दरवर्षी दिवाळी संपताच गुजरात राज्यातील हजारो भाविक पदयात्रेने शिर्डी येथे जात असताना, प्रथम सप्तश्रृंगीचे दर्शन घेऊन शिर्डीकडे मार्गस्थ होत आहेत.

यात शनिवारी (ता. १८) आणि रविवारच्या सुट्टीमुळे गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

‘अंबे माते की जय’ जयघोष करीत भक्तांनी दोन ते तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर दर्शन होत होते. न्यासाच्या प्रसादालयात गेल्या चार दिवसांत सुमारे तीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

रात्री नऊनंतर मंदिर बंद

मागील वर्षी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने आदिमायेचे मंदिर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, दिवाळी व सुट्टी कालावधीत जवळपास ९ दिवस २४ तास मंदिर खुले ठेवले होते.

यंदा विश्वस्त मंडळ व प्रशासनाने मंदिराच्या वेळेबाबत बदल केलेला नाही. त्यामुळे रात्री नऊनंतर मंदिर बंद करण्यात येत आहे.

Devotees thronged the steps of Sri Bhagwati temple for darshan.
Diwali Festival: बजेट मामांची संकल्पना; सलग चौथ्या वर्षीही उजळली मुखेडची स्मशानभूमी

रात्री उशिरा आलेल्या भाविकांना मुखदर्शन घेऊनच परतावे लागत आहे. दरम्यान, चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणेच भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी न्यासाची प्रशासकीय व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

वाहतुकीची कोंडी

चैत्रोत्सव, नवरात्रोत्सवात गडावर खासगी वाहनांना बंदी असते. त्यामुळे गडावर वाहनांची कोंडी होत नाही. मात्र, इतर वेळी वाहने थेट नेण्याची परवानगी असल्यामुळे गडावर खासगी वाहनांची मोठी गर्दी होवून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

"दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत गुजरातमधील पदयात्रेकरू व दिवाळी सुट्टीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविक गडावर मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे."-धनेश गायकवाड, व्यावसायिक

Devotees thronged the steps of Sri Bhagwati temple for darshan.
Nashik News: दूध संकलनाचा हिशोब ग्रामपंचायतकडे द्यावा लागणार; सिन्नर तहसीलदारांचे निर्देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()