लखमापूर : कादवा सहकारी साखर कारखान्याची प्रतिकूल परिस्थिती असतानाही या गळीत हंगामात दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले असून, विविध अडचणींवर मात करत इथेनॉलनिर्मितीला सुरवात होऊन ५९ हजार २३२ लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. (2 lakh tonnes of Kadava sugar factory galap Production of 59 thousand liters of ethanol Nashik News)
चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते पूजन झाले. प्रकल्प मागील वर्षी सुरू झाला. मात्र, इथेनॉलनिर्मितीची परवानगी नसल्याने प्रारंभी स्पिरीट निर्मिती करण्यात आली. या हंगामात इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळाली व पाच लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा कोटा मिळाला.
मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याने काम थांबले. मात्र, शासनाने बंदी मागे घेतली आणि कोटा कमी करत बी. हेव्ही मोलासेसपासून तीन लाख लिटर इथेनॉलनिर्मिती करण्यास परवानगी दिली.
‘कादवा’ने इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. दोन दिवसांत ५९ हजार २३२ लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. २३,६५,५४७ लिटर स्पिरीटची निर्मिती झाली आहे.
यंदा दुष्काळी स्थितीमुळे ऊसटंचाई, तसेच ऊसतोड मजूरटंचाई असल्याने विविध अडचणींवर मात करत कादवाने गाळपचा दोन लाख टनचा टप्पा पूर्ण केला आहे.
सोमवारी (ता. २९) १३.०१ टक्के उतारा मिळाला. २७०५ टन, तर ८६ दिवसांत एकूण २,०१,६७४ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी ११.६१ टक्के साखर उतारा मिळाला. २,३२,८०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे.
ऊसतोड कार्यक्रमानुसार ऊस तोडणी सुरू असून, जिल्ह्यात ‘कादवा’चा साखर उतारा सर्वाधिक असून, सर्वाधिक एफआरपी मिळण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादकांनी ‘कादवा’ला ऊसपुरवठा करावा, असे आवाहन ‘कादवा’चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे.
व्हाइस चेअरमन शिवाजीराव बस्ते, संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर, सर्व खातेप्रमुख या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.