Nashik: 2 मंडळाधिकारी, 27 तलाठी कार्यालयांसाठी 4 कोटी! पिंपळस-येवला रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 560 कोटींचा निधी

concreting
concreting esakal
Updated on

येवला : नाशिक-निफाड-येवला चौपदरी रस्त्याचे पिंपळस ते येवलादरम्यानच्या काँक्रिटीकरणासाठी ५६० कोटी, दोन मंडलाधिकारी व २७ तलाठी कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे.

त्यासाठी ३ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (2 mandal officer 4 Crores for 27 Talathi Offices 560 crore fund for concreting Pimplas Yeola road Nashik)

मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक-येवला रस्त्याचे २००६ मध्ये चौपदरीकरण झाले होते. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीस मंजुरी मिळाली होती.

गेल्या अर्थसंकल्पातून रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला होता. नाशिक-निफाड- येवला रस्ता १७९ ते २३५ किलोमीटर म्हणजे पिंपळस ते येवला या भागाचा समावेश आहे.

concreting
Nashik News: पिंपळगाव-चंडीकापूर रस्ता दुरुस्तीसाठी अडीच कोटी

या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर होऊन रस्त्याच्या दुरस्तीला मंजुरी मिळाली आहे. मतदारसंघातील तब्बल २९ कार्यालयांना इमारती मिळणार असून, नागरिकांना महसुली सुविधा जलद गतीने मिळण्यास मदत होणार आहे.

विश्रामगृहासाठी ५ कोटी ८१ लाख

मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पुरवणी अर्थसंकल्पात येवला शासकीय विश्रामगृहासाठी ५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाली आहे. येथील प्रशासकीय संकुलातील बैठक कक्षाचे नूतनीकरण व फर्निचर करण्यासाठी ६२ लक्ष ८४ हजार निधीची तरतूद झाली आहे.

concreting
Nashik Road Damage: जपून जारे...पुढे खड्डा आहे! सायखेडा पुलावरील स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.