Nashik Corona Update: जिल्ह्यात आणखी 2 कोरोनासदृश्य रुग्ण; त्र्यंबकची महिला कोरोना पॉझिटिव्ह, तालुकानिहाय स्क्रिनींग सेंटर

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असला तरी, जेएन-१ हा कोरोनाचा नवीन व्हायरंटचा रुग्ण जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही.
Nashik Corona Update
Nashik Corona Updateesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असला तरी, जेएन-१ हा कोरोनाचा नवीन व्हायरंटचा रुग्ण जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही.

त्र्यंबकेश्वर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह निष्पन्न झाला आहे परंतु प्रकृती स्थिर आहे. तर, सिन्नर तालुक्यातील दोन रुग्णांची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आहे.

कोरोनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी स्क्रिनिंग सेंटर्स सुरू केले आहेत.

त्यानुसार तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, कोरोनासदृश्य रुग्ण आढळून आल्यास तात्काळ त्याच्या संपर्कातील रुग्णांची स्क्रिनींग करण्याचेही निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिले आहेत. (2 more corona like patients in district Trimbaks female corona positive taluka wise screening center nashik)

त्र्यंबकेश्वर येथील महिला प्रसुतीनंतर कोरोनासदृश्य आढळून आली होती. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची आरटीपीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाली आहे.

तर तिला जेएन-१ हा कोरोनाचा नवीन व्हायरंटची लागन झाल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. तिचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहे. मात्र तिची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सिन्नर तालुक्यातील दोन रुग्ण कोरोनासदृश्य आढळून आले आहेत. त्यांची रॅपिट टेस्ट पॉझिटिव्ह असून, आरटीपीसीआरचा अहवाल प्रलंबित आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. यात एक वयोवृद्ध तर दुसरी रुग्ण महिला आहे.

Nashik Corona Update
Corona Updates : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट राज्यात पाय पसरतोय; सोमवारी २८ रुग्णांची नोंद

तालुकानिहाय स्क्रिनिंग

कोरोना प्रादूर्भाव वेळीच रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या बैठकीमध्ये जिल्ह्यात तालुकानिहाय स्क्रिनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरवर तज्ज्ञ फिजिशियनामार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.

केवळ सेंटरवर येणाऱ्यांची नव्हे तर परिसरात जाऊनही स्क्रिनींग केली जाणार आहे. त्यासाठी रॅपिट टेस्ट किट पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यात कोरोनासदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्याचठिकाणी उपचार सुरू केले जातील.

रुग्ण पॉझिटिव्ह व प्रकृती गंभीर असेल तर त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येईल. याचप्रमाणे, नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागांनाही स्क्रिनींग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लॅब कार्यान्वित

जिल्हा रुग्णालयाची लॅब कार्यान्वित आहेच. परंतु कोरोना काळात सुरू असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आणि मविप्रच्या वैदयकीय महाविद्यालयाच्या लॅब बंद आहेत.

त्यांना त्या येत्या आठवडाभरात सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, दोन्ही महापालिकांना रॅपीड टेस्ट कीटचाही पुरवठा जिल्हा रुग्णालयाकडून केला जाणार आहे.

Nashik Corona Update
Nashik Corona Update: शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे 2 रुग्ण; आरोग्य विभागाचे सतर्क राहण्याचे आवाहन

संसर्ग लक्षणीय पण मृत्यु नाही

कोरोनाचा जेएन-१ हा नवीन व्हायरंटचा संसर्ग वेगात होतो. त्यामुळे समाजात संसर्ग मोठया प्रमाणात पसरतो आहे. परंतु यातून मृत्युचे प्रमाण नगण्य असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

लक्षणे

- सर्दी, खोकला, ताप, थंडी अशी लक्षणे आहेत. यातून रुग्णाला निमोनियाचा त्रास उदभवतो. परंतु त्यातून वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण तात्काळ बरा होतो.

"जिल्ह्यात कोरोना जेएन-१ या नवीन व्हायरंटचा एकही रुग्ण अद्याप निष्पन्न झालेला नाही. एकच महिला रुग्णास कोरोना निष्पन्न झाली आहे. दोघांचे कोरोनाचे अहवाल प्रलंबित आहेत. तालुकानिहाय स्क्रिनिंग सुरू केली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे."

- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक,  नाशिक

Nashik Corona Update
Jalgaon Corona Update: जिल्ह्यात ‘जेएन १’चा भुसावळ, जळगावला रुग्ण; दोघांनाही सौम्य लक्षणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.