केरसाणेत विज पडून 2 बैल ठार; ऐन पावसाळ्यात आदिवासी बांधवांचे नुकसान

bulls death
bulls deathesakal
Updated on

नरकोळ (जि. नाशिक) : केरसाणे (ता. बागलाण) येथे वीज पडून (lightning strike) दोन बैल ठार (Bulls death) झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. (2 oxen killed in lightning strike in Kersane Nashik News)

केरसाणे शिवारातील मुंगसे रोडवरील शोभा जिभाऊ पवार या आदिवासी महिलेच्या (Tribal Women) शेतातील घराजवळ बांधलेल्या बैलजोडीवर सायंकाळी साडेचारच्या सुमारास वीज पडून दोन बैल ठार झाले. यात पवार यांचे अंदाजे एक लाख पंधरा हजारांचे नुकसान झाले. दोन वर्षापूर्वी शेतीकामासाठी त्यांनी बैलजोडी घेतली होती. अचानक नुकसान झाल्याने त्यांना ऐन पेरणीच्या वेळी मोठी अडचण निर्माण झाली. तलाठी आदिश कापडणीस, कोतवाल कैलास गांगुर्डे, विरगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे यांनी पंचनामा केला.

bulls death
HSC Result : एकाच कुटुंबातील सासरे, सून, दीर बारावीत उत्तीर्ण

या वेळी लक्ष्मण मोरे, ग्रामपंचायत सदस्या संगीता पवार, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब खरे, शरद अहिरे, ग्रामस्थ सुरेश माळीस, राजेंद्र माळीस, राजाराम आनंदा अहिरे, दीपक अहिरे, अभिमन माळी, भिका अहिरे, विठ्ठल माळीस, भास्कर माळीस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

bulls death
घोरवड घाटात कार कोसळली; एकाचा मृत्यू, 2 जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.