सराफ वाड्याची भिंत कोसळून 2 जण जखमी

ruined part of the dangerous Saraf  wada
ruined part of the dangerous Saraf wadaesakal
Updated on

जुने नाशिक : पावसामुळे (Rain) शुक्रवारी (ता. १५) जुने नाशिकमधील बुरूड गल्लीतील दीपक सराफ यांचा सराफ वाडा कोसळण्याची (saraf Wada collapsed) घटना घडली. यात वडील, मुलगा असे दोन जण जखमी झाले आहे.

खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास बुरूड गल्ली येथील सराफ यांचा तुटलेल्या अवस्थेत असलेला सराफ वाड्याची भिंत अचानक कोसळली.

या वेळी रस्त्याने जात असलेल्या वडील आणि मुलगा यांच्या अंगावर भिंतीचा काही भाग कोसळल्याने ते जखमी झाले आहे. (2 people injured due to wall collapse of Saraf Wada old nashik latest Marathi news)

ruined part of the dangerous Saraf  wada
छावा क्रांतिवीर सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगर बसच्या नूतन फलकाचे अनावरण

युनूस इब्राहिम शेख (५२) आणि कादीर युनूस शेख (३०, रा. बागवानपुरा) असे जखमींचे नाव आहे. चौक मंडई येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. भद्रकाली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी अग्निशमन दलास माहिती दिली.

अग्निशामक कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा बाजूला करत रस्ता मोकळा करून दिला. ढिगाऱ्‍याखाली कोणी असल्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.

ruined part of the dangerous Saraf  wada
MPSC दुय्यम सेवा परीक्षेच्‍या अर्जासाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ

परंतु, जखमीपैकी एकाने भिंत कोसळण्याच्या वेळी दोघांव्यतिरिक्त आणखी कोणीही त्या ठिकाणी नव्हते अशी माहिती दिली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वाडा कोसळल्याचे वृत्त परिसरात पसरताच बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

तीन वर्षांपूर्वीदेखील याच वाड्याचा एक भाग कोसळण्याची घटना घडली होती. सध्या वाड्याच्या एका बाजूच्या खोल्यांमध्ये काही रहिवासी सध्याही वास्तव्यास आहे. वाड्याचा अन्य भागदेखील धोकादायक झाला आहे. नोटीस देऊनदेखील वाडा मालकाकडून धोकादायक भाग उतरवला गेला नसल्याने घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.