साकोरा (जि. नाशिक) : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे बुधवारी रात्री चोरट्यांनी स्टेट बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्रात अवघ्या वीस मिनिटात एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम आणि परिसरातील दोन मोटारसायकली चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. (2 robberies in one night at Sakora thieves ran away with lakhs In 20 minutes Nashik Crime News)
काही दिवसांपासून नांदगाव तालुक्यात पोलिसांचा धाक कमी झाल्याने भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले आहे. सद्या पोलिसांचे मटका आणि गुटखा बंदी कारवाईकडे लक्ष असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा आता घरफोडी आणि मोटारसायकली कडे वळल्याने या चोरट्यांचा शोध लावणे आता पोलिसांना आवाहन आहे.
अनेक वर्षांपासून साकोरा येथे कपिलेश्वर महादेव मंदिरासमोर सुभाष देविदास उडकुडे यांचे स्टेट बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र असून, बुधवारी रात्री चोरट्यांनी अवघ्या वीस मिनिटात कटरने गेट आणि दरवाज्याचे कोंडे तोडून आत प्रवेश करत एक लाख वीस हजार रुपये घेऊन पसार झाले.
त्यानंतर वेहळगाव रोडवर गणेश बोरसे यांची मोटारसायकल घेऊन सरताळे शिवारात जाऊन गोकूळ सुरसे यांची दुसरी मोटारसायकल घेवून पसार झाले. याबाबत नांदगाव पोलिसांनी गुरुवारी (ता.१९) घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
यावेळी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. तसेच चोरट्यांनी तोडलेले दोन्ही कुलूप ग्रामपंचायतीच्या संरक्षण भिंतीवर मिळून आले. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.