Nashik News : शहरातील 2 शाळांना लागणार कुलूप; मान्‍यतेअभावी शिक्षण विभागाकडून कारवाईची तयारी

Seal Lock file photo
Seal Lock file photoesakal
Updated on

नाशिक : शिक्षण मंडळांच्‍या मान्‍यतेसंदर्भात महापालिकेच्‍या शिक्षण विभागातर्फे शहरातील सोळा शाळांना नोटीस बजावली होती. यापैकी शिक्षण मंडळाची मान्‍यता न घेताच बेधडकपणे सुरु असलेल्‍या शहरातील दोन शाळांना लवकरच कुलूप लावले जाण्याची शक्‍यता आहे.

शिक्षण विभागाकडून कारवाईची तयारी केली जाते आहे. या दोन शाळांपैकी एक सीबीएसई, तर अन्‍य एक राज्‍य शिक्षण मंडळाचे शिक्षणक्रम शिकवत आहे. (2 schools in city will locked Preparation of action by Education Department for non recognition Nashik News)

शाळा सुरु करताना संबंधित शिक्षण मंडळांची, शासनाची मान्‍यता घेणे आवश्‍यक असते. मान्‍यता नसल्‍याने महापालिकेच्‍या शिक्षण मंडळातर्फे काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील सोळा शाळांना नोटीसा बजावण्यात आल्‍या होत्‍या.

यापैकी पाच शाळा सीबीएसईशी निगडीत होत्‍या. दरम्‍यान, या शाळांकडून नुकतेच शिक्षण विभागाला खुलासे सादर करण्यात आले आहेत. त्‍यानुसार काही शाळांकडून मान्‍यतेबाबतचा प्रस्‍ताव संबंधित शिक्षण मंडळांना सादर करण्यात आलेला असून, यासंदर्भात प्रपत्राची प्रत शिक्षण विभागाला सादर करण्यात आली आहे.

लवकरच मान्‍यता प्रक्रिया पूर्ण होणार असल्‍याचे या शाळांकडून सांगण्यात आले आहे. त्‍यामूळे या शाळांच्‍या कार्यवाहीकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागून राहाणार आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Seal Lock file photo
Dada Bhuse on Aditya Thackeray | केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही : भुसे यांचा आदित्य ठाकरेंना टोला!

या शाळांवर कारवाई प्रस्‍तावित

जेल रोड भागातील एमराल्‍ड हाईट्‌स या सीबीएसई शिक्षणक्रम शिकविणाऱ्या शाळेवर मान्‍यतेअभावी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याशिवाय चुंचाळे येथील वंश राजे हिंदी माध्यमिक स्‍कूलला राज्‍य शिक्षण मंडळाची मान्‍यता नसल्‍याने या शाळेवरही कारवाई प्रस्‍तावित असल्‍याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

"शिक्षण मंडळाच्या मान्‍यतेसंदर्भात शहरातील सोळा शाळांना नोटीस बजावली होती. यापैकी काही शाळांनी मान्‍यतेची प्रक्रिया सुरु असल्‍याचे कळविले आहे. मंडळाची मान्‍यता नसलेल्‍या शाळांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे."

-सुनिता धनगर, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका.

Seal Lock file photo
Nashik News : बदलीच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचा हिरमोड; संवर्ग चारची यादी प्रसिद्ध होईना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.