Nashik Crime: चोरीच्या दुचाक्या ग्रामीण भागात विक्री करणारे दोघे गजाआड; संशयितांकडून चोरीच्या 17 दुचाक्या जप्त

संशयितांकडून १३ लाख ३५ हजारांच्या चोरलेल्या १७ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Bikes Seized
Bikes Seizedesakal
Updated on

नाशिक : शहराच्या विविध भागातून चोरलेल्या दुचाक्या ग्रामीण भागात अत्यंत कमी किमतीमध्ये विकणाऱ्या दोघा अट्टल दुचाक्या चोरट्यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.

संशयितांकडून १३ लाख ३५ हजारांच्या चोरलेल्या १७ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. (2 selling stolen two wheelers in rural areas jailed 17 stolen bikes seized from suspects Nashik Crime)

विशाल मधुकर धांडे (३८, रा. महादेव मंदीराजवळ, केवल पार्क, अंबड), मोहन शालीग्राम ढाके (३७, रा. ओंकारेश्वर महादेव मंदीराजवळ, स्वामीनगर, अंबड) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्याविरोधात धुळे जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने दुचाक्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत होते. यासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेशाखांना तपासाचे आदेश दिले होते.

त्यानुसार शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पथक तपास करीत असताना, दोन दुचाकी चोरटे चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी सिडको परिसरात येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना मिळाली होती.

त्यानुसार, पथकाने सापळा रचून दोघा संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस चौकशीमध्ये संशयितांनी शहरभरातून एक डझनपेक्षाही अधिक दुचाक्या चोरी केल्याचे उघड झाले.

यातील पाच दुचाक्या या दोघांनी गेल्या पंधरा दिवसात चोरलेल्या आहेत. संशयितांकडून चोरीच्या तब्बल १७ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

सदरची कामगिरी गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहायक उपनिरीक्षक यशंवत बेडकोळी, बाळु शेळके, प्रशांत वालझाडे, शंकर काळे, चंद्रकात गवळी, विजय वरंदळ, सुनिल आहेर, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, संजय सानप, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, राजेंद्र घुमरे, मधुकर साबळे, अतुल पाटील, नितिन फुलमाळी, प्रविण वानखेडे यांनी बजावली. 

Bikes Seized
Solapur Crime : कौटुंबीक वादातुन दोघावर गोळीबार मोहोळ तालुक्यातील घटना

अवघ्या ५-१० हजार विक्री 

संशयित दोघेही अट्टल दुचाकी चोर असून, चोरलेली दुचाकी ग्रामीण भागात मिळेल त्या किमतीमध्ये विक्री करायचे. शहरातून चोरलेल्या दुचाक्या दोघांनी जळगाव, धुळे, आणि नाशिक ग्रामीण भागात विकल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

युनिट दोनच्या पथकाने अशा १७ दुचाक्या हस्तगत केल्या. यात बुलेट, अव्हेंजर, शाईन, पल्सर, मोपेड या वाहनांचा समावेश आहे. या दुचाक्या संशयितांनी अवघ्या ५ ते १० हजार रुपयांमध्ये विक्री केल्या होत्या. 

या हद्दीतील गुन्ह्यांची उकल

अंबड पोnलीस ठाणे - ५

सरकारवाडा पोलीस ठाणे - ३

इंदिरानगर पोलीस ठाणे - १

आडगाव पोलीस ठाणे - २

गंगापूर पोलीस ठाणे - १

चार दुचाक्यांबाबत तपास सुरू आहे.

Bikes Seized
Yavatmal Crime: महिलेचं ३० ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं, पोलिसांकडून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.