Nashik News : जिल्ह्यात सव्वादोन हजार बालकांना श्‍वसनसंबंधी आजार

2 thousand children have respiratory diseases in the district Nashik News
2 thousand children have respiratory diseases in the district Nashik News esakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात जागरूक पालक सुदृढ बालक योजनेंतर्गत १२ लाख दोन हजार ७९१ बालकांपैकी सहा लाख ७४ हजार १८३ बालकांची तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीत तब्बल ३९० बालके कुपोषित सापडली आहेत, तर दोन हजार २१४ बालकांना श्‍वसनाशी संबंधित आजार आहेत.

३७ बालकांना जन्मजात बहिरेपणा असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. या बालकांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

2 thousand children have respiratory diseases in the district Nashik News
Nashik Rain: अवकाळी पावसाने द्राक्ष नगरी हळहळली; बळीराजाच्या हातच्या पिकांवर पाणी

‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात ग्रामीण, शहरी व मनपा विभागातील शून्य ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी सध्या सुरू आहे. जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून हे अभियान सुरू आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंगणवाड्या, बालगृहे, समाजकल्याण व आदिवासी वसतिगृहे, खासगी शाळा, नर्सरी, तसेच शाळाबाह्य मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्या यंत्रणेने ७८२ शाळा आणि एक हजार १७८ अंगणवाडी केंद्रावरील शून्य ते सहा वयोगटातील एक लाख ६२ हजार ४९४ बालकांची तपासणी केली. तसेच, सहा ते दहा या वयोगटातील पाच लाख अकरा हजार ६८९ विद्यार्थ्यांची म्हणजेच ५१ टक्के तपासणी झाली आहे.

2 thousand children have respiratory diseases in the district Nashik News
Nashik Crime News : तहसीलच्या वाहनचालकाने दीड लाखांची घेतली लाच; अधिकाऱ्याच्या नावाचा वापर

तपासणी झालेल्या बालकांचे ५२ प्रकारच्या विविध आजारात वर्गीकरण केले आहे. यात ६८ बालके तीव्र कुपोषित, तर ३२२ बालके मध्यम कुपोषित आढळली. दोन हजार २१४ बालकांना श्‍वसनाशी संबंधित आजार असून, दोन हजार ६७ बालकांना पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. यातील १४० बालकांवर सध्या उपचार सुरू असून, सात बालकांवर उपचार झाले आहेत.

१३ हजार १६४ बालके आजारी

४ मार्चपर्यंत तपासणी झालेल्या बालकांमध्ये १३ हजार १६४ बालकांना विविध आजारांची लागण झाली आहे. यात नऊ हजार ४४१ बालकांवर उपचार सुरू असून, तीन हजार ४५७ बालकांना दाखल केले आहे. २६७ बालकांवर शस्त्रक्रिया व उपचार झाले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने जन्मजात मोतीबिंदू- नऊ, जन्मजात बहिरेपणा- ३७, हृदयरोग- ११७, सिकलसेल- चार, रक्तक्षय- ६९७, अ जीवनसत्त्वाची कमतरता- १९८, ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता- १२२, कानातील आजार- १८१, गलगंड- सहा, डोळ्यांचा तिरळेपणा- ३६२, दृष्टिदोष- ५२६, बालपणातील कृष्ठरोग-४ , कर्करोग- १४, तर ११४ बालके मतिमंद आढळली आहेत.

2 thousand children have respiratory diseases in the district Nashik News
Nashik News : आईला करावी लागली मुलीची प्रसूती; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाचा प्रस्ताव

तेराशे बालकांना थंडी-ताप

शहरासह ग्रामीण भागात बदलत्या हवामानामुळे थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. या तपासणीत एक हजार तीनशे एक बालकांना तापसदृश आजाराची लागण झाली आहे. थंडी-ताप असलेल्या बालकांची संख्या तालुकानिहाय वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.