Sports Quota Govt. Job: खेळाडूंना 2 वर्षांची सवलत! राज्य सरकारच्या निर्णयामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ

Sports Quota Govt. Job
Sports Quota Govt. Jobesakal
Updated on

Sports Quota Government Job : क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंसाठी अतिशय आनंदाची बातमी असून, राज्य सरकारने खेळाडूंना दोन वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनाही दिलासा मिळाला आहे. (2 years discount for players Increase in maximum age limit for employment due to State Govt nashik news)

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याविषयी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता. ७) परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार कोरोना काळात दोन वर्षे खेळाडूंचे वाया गेले. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे वाढवून देण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या विविध विभागांत ७५ हजार नोकर भरती केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे. वयोमर्यादेतील ही सूट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहील. म्हणजे या काळात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.

नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना व खेळाडूंना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sports Quota Govt. Job
Chhagan Bhujbal: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा सविस्तर प्रकल्प तयार करावा; भुजबळांची सरकारकडे मागणी

आता ४५ वर्षे वय ग्राह्य धरणार

राज्य सरकारने कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथीलता दिल्यामुळे खेळाडूंना विहित केलेली कमाल वयोमर्यादा ४३ वरून ४५ करण्यात आली आहे.

तसेच, खुल्या वर्गासाठी ३८ वरून ४० वर तर मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षांवरून ती ४५ वर्ष करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे शासकीय नोकरीची दारे अजूनही खुली आहेत.

"या निर्णयामुळे वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या खेळाडूंनाही लाभ होईल. पात्र असलेल्या जास्तीत जास्त खेळाडूंनी या निर्णयाचा फायदा घेतला पाहिजे."

- सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

Sports Quota Govt. Job
Nashik News: पुनर्विनियोजनातील केलेले नियोजन रद्द करा; राज्याच्या नियोजन विभागाकडे 6 आमदारांची तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.