Nashik Crime News : हातउसनवार घेतलेल्या एक लाखाच्या रकमेपोटी विश्वासाने दिलेला लाखाचा धनादेश खात्यात शिल्लक न ठेवता न वटवून फसवणूक केल्याने दापुरे येथील छोटूसिंग खड्डा यांना येथील न्यायालयाने व्याजासह एक लाख ३७ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई, दोन वर्षांचा कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचा निकाल दिला. (2 years punishment for fraudsters for non crossing of cheque nashik crime news)
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. पी. भावसार यांनी हा निकाल दिला. दापुरे (ता. मालेगाव) येथील विश्वास दामू कदम यांच्याकडून छोटूसिंगने लाख रुपये उसनवार घेतले होते. ही रक्कम परतफेडीसाठी त्यांनी कदम यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मालेगाव शाखेचा धनादेश (क्रमांक ७१३५८०) दिला होता.
हा धनादेश छोटूसिंग खड्डा यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटला नाही. त्याविरोधात विश्वास कदम यांनी येथील न्यायालयात दि निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्ट अन्वये दावा दाखल केला होता. या दाव्यात कदम यांच्यातर्फे ॲडव्होकेट एस. बी. इंगळे यांनी बाजू मांडली.
श्री. कदम यांची साक्ष, धनादेश, बाउंस मेमो, हातउसनवार पावतीचा स्टॅम्प, नोटीस, मूळ कागदपत्रे आदी न्यायालयात सादर केल्यामुळे न्यायालयाने कदम यांची बाजू व इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून छोटूसिंगने श्री. कदम यांना व्याजासह एक लाख ३७ हजारांची नुकसानभरपाई देण्याचा, तसेच दोन वर्षांचा कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ॲडव्होकेट इंगळे यांना ॲडव्होकेट प्रतीक इंगळे व जयश्री वाघ यांनी सहकार्य केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.