Nashik: बाप्पाचा निरोप ठरला अखेरचा; विसर्जनला गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू

Latest Ganesh Visarjan News: तब्बल एक तास प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह नदी बाहेर काढले.
Nashik: बाप्पाचा निरोप ठरला अखेरचा; विसर्जनला गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू
Updated on

Nashik Latest News: संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच नाशिक मधुन एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. या ठिकाणी विसर्जनाला गालगोट लागले असून नदीपत्रात बुडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दोघेही युवक सायंकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी वालदेवी नदी पात्रात एका खड्ड्यात पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओंकार गाडे व स्वयंम मोरे अशी या दोन मृत्यू युवकांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.