Jalyukta Shivar Scheme : जलयुक्त शिवार योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील संबंधित विभागांनी २०४ कोटींचा आराखडा तयार केला असून, त्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने केवळ २०.३६ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. प्राप्त निधीच्या आधारे प्रशासकीय कामांना लवकरच मंजुरी दिली जाईल.
जलयुक्त शिवार या योजनेतून नाशिक जिल्ह्यात २३१ गावांमध्ये दोन हजार ९४३ कामांसाठी २०४ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत निधीबाबत शासनाचे मार्गदर्शन नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या आराखड्यातील कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या नव्हत्या.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
जलसंधारण विभागाने आता नाशिक जिल्ह्यातील जलयुक्त शिवारसाठी २०.३६ कोटी रुपयांची तरतूद कळवली असून, या निधीतून कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मृद व जलसंधारण, वन विभाग, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग, कृषी विभाग या सर्व विभागांनी १५ तालुक्यांमधील २३१ गावांमध्ये दोन हजार ९४३ कामे निश्चित केली असून, या कामांमध्ये प्रामुख्याने माती बांध व सिमेंट बांध या कामांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचा आराखडा सर्वाधिक ६९.४८ कोटी रुपयांचा आहे. त्या खालोखाल मृद व जलसंधारण विभागाने ६३.८३ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. वनपरिक्षेत्र विभागाने ३५.१३ कोटी रुपये, भूजल सर्वेक्षण विभागाने १२ कोटी रुपये व कृषी विभागाने २३.५४ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यातील केवळ मृद व जलसंधारण मंत्रालयाने मृद व जलसंधारण विभागाला २०.३६ कोटी रुपये निधी दिला असून, या विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून १५ कोटी रुपये नियतव्यय कळविला. यामुळे या विभागाच्या ६३.८३ कोटींच्या आराखड्यातील कामांसाठी ३५ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे उर्वरित कामांसाठी ३० कोटी रुपये निधी उभारण्यासाठी इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल.
"जलयुक्त शिवारच्या कामांना निधी मिळाल्याने आता प्रशासकीय मान्यता देण्यास सुरवात होईल. टप्प्याटप्प्याने ही सर्व कामे मार्गी लावण्यास आमचे प्राधान्य असणार आहे." - हरिभाऊ गिते, कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.